शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे येथे सर्वेक्षणात आढळले ३० कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शेटफळगढे : पिंपळे (ता. इंदापूर) येथे आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन केलेल्या हॉटस्पॉट सर्व्हेत तब्बल तीस जण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शेटफळगढे : पिंपळे (ता. इंदापूर) येथे आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन केलेल्या हॉटस्पॉट सर्व्हेत तब्बल तीस जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. त्यानंतर गावात सप्ताहामधील सहभागी असलेला एक कार्यकर्ता कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने गावात खळबळ उडाली. त्यानंतर लक्षणे जाणवत असल्याने काहीजणांनी स्वतःहून टेस्ट करण्यास सुरुवात केली. अखंड हरिनाम सप्ताह गावाला भोवला तर नाही ना, अशी चर्चाही परिसरात व्यक्त होत आहे. पिंपळे गावात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह संख्या वाढताना दिसल्याने आरोग्य विभागाने गुरूवारी घरोघरी जाऊन हॉटस्पॉट सर्वेक्षण केले. यासंदर्भात, आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. कैलास व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एका दिवसात ३० रुग्ण आढळून आले आहेत. तर, डॉ. गणेश पवार यांनी माहिती देताना सांगितले की, आरोग्य विभागाने कोरोना पॉझिटिव्ह संख्या पिंपळे गावात वाढत असल्याचे लक्षात येताच घरोघरी जाऊन लोकांना कोरोनासंदर्भात घ्यावयाची काळजी त्याचे मार्गदर्शन करीत सुमारे ११९ लोकांची तपासणी केली. त्यामध्ये ३० रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर यापूर्वीचे सहा रुग्ण ॲक्टिव आहेत. पिंपळे गावातील कोरोना रूग्णांचा आकडा यामुळे ३६ वर गेला आहे.

चौकट.

या परिसरात एका गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याची तपासणी मृत्यूनंतर तपासणी केली असता तोही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या परिसरात कोरोनाची दुसरी लाट तर नाही ना आली, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.