इतर मागास प्रवर्गाबरोबर मराठा समाजाचे सर्वेक्षण करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 07:30 IST2021-12-17T07:29:51+5:302021-12-17T07:30:11+5:30

लागणारा वेळ लक्षात घेऊन मराठा समाजाचे इतर मागास प्रवर्गाबरोबर आताच सर्वेक्षण करावे, मराठी क्रांती मोर्चाची मागणी.

Survey the Maratha community along with other backward classes; Demand of Maratha Kranti Morcha | इतर मागास प्रवर्गाबरोबर मराठा समाजाचे सर्वेक्षण करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

इतर मागास प्रवर्गाबरोबर मराठा समाजाचे सर्वेक्षण करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

पुणे : आरक्षणाच्या अनुषंगाने पुढे आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यास लागणारा वेळ लक्षात घेऊन मराठा समाजाचे इतर मागास प्रवर्गाबरोबर आताच सर्वेक्षण करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने मागणी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाला निवेदन देण्यात आले.
 
निकाल व आदेशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकासाठी इतर मागास प्रवर्ग, ज्यात एकूण ६ उपप्रवर्ग केले आहेत. त्यांच्या सर्वेक्षणाचे काम राज्य मागासवर्ग आयोगाने हाती घेतले आहे, असे सांगण्यात आले.

Web Title: Survey the Maratha community along with other backward classes; Demand of Maratha Kranti Morcha