सुरेश प्रभूंनी मदतीचा हात दिला अन् तब्बल दोन महिने फ्रान्समध्ये अडकलेला 'शुभम'कुटुंबाला परत मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 01:49 PM2020-05-27T13:49:43+5:302020-05-27T13:56:34+5:30

या कुटुंबाने मुलाला भारतात परत आणण्यासाठी अनेक नेते, मंत्री, यांना फोन करुन, प्रत्यक्ष त्यांच्या घराचे उंबरे झिजवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली...

Suresh Prabhu ran for help. Shubham reach safety at home who Stuck in France | सुरेश प्रभूंनी मदतीचा हात दिला अन् तब्बल दोन महिने फ्रान्समध्ये अडकलेला 'शुभम'कुटुंबाला परत मिळाला

सुरेश प्रभूंनी मदतीचा हात दिला अन् तब्बल दोन महिने फ्रान्समध्ये अडकलेला 'शुभम'कुटुंबाला परत मिळाला

googlenewsNext

पुणे: कोरोनाने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली अन् अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर करत आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे देश विदेशात अनेकजण अडकून पडले. माणुसकीच्या भावनेतून भारताने परदेशात अडकलेल्या अनेकांना विमानाने मायदेशी परत आणले. मात्र, इतर देशांत अडकलेल्यांची संख्या प्रचंड मोठी असल्याने सर्वांनाच तातडीने परत आणणे सरकारलाही शक्य नव्हते. असाच एक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण फ्रान्स येथे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात इंटर्नशिप करण्यासाठी गेला होता. त्याची इंटर्नंशिप संपत आली आणि तिथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊन जाहीर झाला. तब्बल दोन महिने तेथे अडकल्यामुळे त्याच्याकडचे पैसेही संपत आले होते. 
कुटुंबाने मुलाला भारतात परत आणण्यासाठी अनेक नेते, मंत्री, यांना फोन करुन, प्रत्यक्ष त्यांच्या घराचे उंबरे झिजवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, प्रश्न जागतिक पातळीवरचा असल्याने सर्वचजण हतबल होते. त्याचवेळी या कुटुंबाच्या मदतीला धावून आले ते माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू. त्यांच्या प्रयत्नांमुळे तो मुलगा मायदेशी परतला तेव्हा या कुटुंबाच्या आनंदाला आभाळ ठेंगणे झाले. सुरेश प्रभू यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. 

मूळचे मदनसुरी (ता .निलंगा) येथील व सध्या पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते संजीव माने यांचा मुलगा फ्रान्स येथे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात इंटर्नशिप करण्यासाठी गेला होता.परदेशात शिक्षणासाठी गेलेला माने कुटुंबातील हा पहिलाच मुलगा.त्याची इंटरंशिप संपायची वेळ आली आणि फ्रान्समध्ये कडक लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे जागतिक विमानसेवा संपूर्ण बंद झाली व शुभम फ्रान्समध्ये अडकला गेला. तब्बल दोन महिने तेथे अडकल्यामुळे त्याच्याकडचे पैसेही संपत आले होते. घरची परिस्थिती मध्यमच. रात्रंदिवस हे कुटुंब अस्वस्थ होऊन परमेश्वराचा धावा करत होत. तसेच राजकीय नेतमंडळी यांना भेटून याबाबत मदत करण्याची विनंती करत होते पण जागतिक पातळीवरचे काम असल्यामुळे परिस्थितीत काही सुधारणा होत नव्हती.
अशातच त्यांनी विश्वशक्ती इंटरनॅशनल फाऊंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांच्याशी संपर्क साधून सविस्तर वृत्तांत सांगितला. कोहिनकर यांनी त्वरित राज्यसभा सदस्य व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला व शुभमला मदत करण्याची विनंती केली .सुरेश प्रभू यांनी त्वरित फ्रान्स मंत्रालयाशी संपर्क साधला व शुभमला मदत करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले .सुरेश प्रभू यांच्या फोनमुळे फ्रान्स मंत्रालयाने शुभमला लवकरात लवकर निघणाऱ्या विमानात प्रवेश देण्याचे आश्वासन दिले व त्याचप्रमाणे त्याला वैयक्तिक मदतही केली. अखेर बुधवारी (दि. २७) सकाळी शुभम मायदेशी परतला. माने कुटुंबांनी अश्रू ढाळत सुरेश प्रभूंविषयी आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: Suresh Prabhu ran for help. Shubham reach safety at home who Stuck in France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.