Supriya Sule : "राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:30 IST2025-02-26T15:30:05+5:302025-02-26T15:30:27+5:30

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

Supriya Sule tweet Over pune crime news 26 year old girl swargate bus stand | Supriya Sule : "राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

Supriya Sule : "राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. "राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?" असा सवाल विचारला आहे. 

"पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेलं नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अतिशय संतापजनक! स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे." 

"पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेलं नाही." 

"ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचं प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. 

स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. मात्र तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. याच दरम्यान आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतलं आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बस बंद असल्याचं लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितलं आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला.  

Web Title: Supriya Sule tweet Over pune crime news 26 year old girl swargate bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.