शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाल्या सप्रिया सुळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 18:55 IST

"जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलने अयोग्य..."

पुणे : मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, मी सदर चित्रफीत पाहिली आहे. हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचे आरोप करण्याइतके टोकाचे पाऊल उचलणे योग्य नसून, विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अयोग्य आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

देशातील पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्याबाबबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याबरोबर आयाेजित बैठकीनंतर खासदार सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.

हा प्रकार गैरसमजातून-

सुळे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील चित्रफित दोन- तीन वेळा पाहिली. हा प्रकार घडला त्यावेळी आजूबाजूला प्रचंड गर्दी होती. जितेंद्र आव्हाड यांनी त्या गर्दीत खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील हात लावला होता. त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेला हाताने बाजूला केले. त्या गदारोळात नेमके काय झाले, हे कळत नाही. पण त्यावेळी त्या महिलेवर विनयभंग कसा काय होऊ शकतो. हा प्रकार गैरसमजातून झाला असून, संबंधित महिलेची देखील बाजू ऐकून घेतली पाहिजे. पण जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलने अयोग्य आहे.

राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढा-

दरम्यान आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा. मुंब्रा मतदार संघातील जनतेने जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिले आहे. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत. झालेल्या प्रकारावर आमदारकीचा राजीनामा देणे हा उपाय नाही. आम्ही देखील अनेक कार्यक्रमाला जातो, तेव्हा अशी गर्दी आणि गदारोळ होतो. मी 'भारत जोडो' यात्रेत गेले होते. त्यावेळी काही मुले माझा हात ओढत होती. आता मी त्याला विनयभंग म्हणायचे का, असा प्रश्नही खासदार सुळे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtraमहाराष्ट्रShrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे