शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या मधुमेही बालकांसाठी सुप्रिया सुळे ठरल्या " देवदूत "

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 4:34 PM

बारामती शहरातील १८ मुलांना टाईप १ हा लहान मुलांना मधुमेहाचा दुर्धर आजा; साधारण एका मुलाला महिन्याला २० हजार रुपये खर्च..

ठळक मुद्देपुण्यातील जहांगीर ट्रस्टने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी साधला संपर्क या मधुमेह रुग्ण मुलांना महिन्यातून दोन वेळा औषध व तपासणी मोफत केली जाते.

बारामती : देशात कोरोना संसर्गामुळे शासनाने देशात लॉकडाऊन केल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नाही. परिणामी बारामती तालुक्यातील लहान मुलांना टाईप १ या मधुमेहाचा दुर्धर आजार असलेले बालरुग्ण औषध,उपचारापासून आवश्यक औषधांपासुन वंचित होते. या मुलांना १५ दिवसांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयातून तपासणी व औषध आणण्यासाठी जावे लागते. पण या संचारबंदीमुळे त्यांना पुण्याला वाहतूक बंद आहे.त्यामुळे औषध वेळेत न मिळाल्यास या मुलांचा जीव देखील जाऊ शकतो .त्यामुळे अस्वस्थ झालेल्या जहांगीर मेडीकल ट्रस्टने  बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला.त्यावर खासदार सुळे यांनी त्याची दखल घेत  ही औषधे वेळेत या मुलांपर्यंत पोहचवून त्यांचा जीव वाचवला आहे.त्यामुळे खासदार सुळे या मुलांसाठी ''देवदूत''  ठरल्या आहेत.बारामती शहरातील १८ मुलांना टाईप १ हा लहान मुलांना मधुमेहांचा दुर्धर आजार आहे. टाईप १ हा आजार अगदी काही महिन्यांच्या बाळांपासून १८ वर्षापर्यंतच्या मुलांना होतो.या मुलांना दिवसातून चार वेळा इंजेक्शन घ्यावी लागतात.  ही इंजेशन महागडी असून साधारण एका मुलाला महिन्याकाठी २० हजार रुपये खर्च येतो. या मुलांना हिराबाई काबसजी जहांगीर मेडिकल रिसर्च कडुनही औषधें दिली जातात.आजाराने बाधित असलेल्या  या रुग्णांना रोज चार वेळा हे इंजेक्शन घ्यावेच लागते . टाईप १ या मधुमेहावर जगात कुठे औषध नाही.त्यामुळे न चुकता यांना महिन्यातून दोन वेळा औषधांसाठी पुण्याला जावेलागते. मात्र कोरोना संसगार्मुळे या मुलांना पुण्याला जाणे , पुण्यातूनहॉस्पिटलला बारामतीला औषध देणे शक्य नव्हते.यावर जहांगीर ट्रस्टने बारामतीच्या खासदार सुळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना वस्तुस्थितीसांगितली.त्यावर सुळे यांनी त्यांनी काळजी करू नका, त्या मुलांना वेळेत औषध दिली जातील, अशा शब्दात त्यांना दिलासा दिला.त्यांनी वेगाने हालचाली करत बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनायाबाबत सुचना दिल्या. बारामती शहर पोलीस स्टेशन कडुन परवानगी घेत औषधआणण्यासाठी गाडी पाठवली. लॉकडाऊनची शाश्वती नसल्याने सुळे यांनी त्यामुलांना  दोन महिन्याची औषध पोहोच केली. यामध्ये रिफिल इंजेक्शन, सुई,चेकिंग स्ट्रिप्स यांचा त्या औषधांमध्ये समावेश आहे.—————————————————...या रुग्णांना जिवंत असे पर्यंत इंजेक्शनच घ्यावे लागते... जहांगीर मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून टाईप १ या मधुमेह रुग्ण मुलांना महिन्यातून दोन वेळा औषध व तपासणी मोफत केली जाते. या आजाराला इंजेक्शन वेळच्यावेळी इंजेक्शन घेणे, त्यांची रक्तातील साखर '' चेक'' करणे हा एकमेव इलाज आहे.हे इंजेक्शन न घेतल्यास त्यांची रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. अगदी साखर सातशे पर्यंत जाऊन जीव देखील जाण्याची भीती असते.तसेच  या रुग्णाच्या हृदय, डोळे, किडनी वर परिणाम होऊन हे रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतात. लहान मुलांना टाईप १ हा मधुमेह झाल्यावर तो बरा होत नाही .यावर गोळ्या, औषध उपलब्ध नाहित. या रुग्णांना जिवंत असे पर्यंत इंजेक्शनच घ्यावे लागते,असे जहाँगीर हॉस्पिटल च्या सिनिअर सोशल वर्कर संध्या गायकवाड यांनी ''लोकमत'' शी बोलताना सांगितले.————————————————————खासदार सुप्रिया सुळे यांनी आमच्या मुलांची औषध वेळेत आणून दिली .आमच्या मुलांची औषधे संपत आली होती .आता पुण्यातून औषध कसे आणायचे हा याच्या पुढे  मोठा प्रश्न होता. मात्र ,बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्हाला दोन महिन्यांनी औषध आणून दिली. आमचे फार मोठे काम केले आहे. विनोद कुलकर्णी, पालक

टॅग्स :BaramatiबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेdiabetesमधुमेहCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस