शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वाहतूक व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचे सहकार्य मोलाचे : के. व्यंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 4:23 PM

‘शहरात वाहतूककोंडी, वायुप्रदूषण या समस्या आपल्याला नियमित भेडसावत आहेत. ही वाहतूक कोंडी फोडून वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना विद्यार्थ्यांकडून मिळणारे सहकार्य मोलाचे ठरत आहे.

ठळक मुद्दे ‘गो सायकल रॅली’तून प्रदूषणमुक्तीचा संदेशवाहतूक व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा चांगला उपयोग

पुणे : ‘शहरात वाहतूककोंडी, वायुप्रदूषण या समस्या आपल्याला नियमित भेडसावत आहेत. ही वाहतूक कोंडी फोडून वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना विद्यार्थ्यांकडून मिळणारे सहकार्य मोलाचे ठरत आहे. त्यामुळे शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहे’, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले.येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गो सायकल रॅली’चे उद्घाटन डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले. खडीमशीन चौक ते बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या केजे शिक्षण संकुलापर्यंत ही रॅली निघाली. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. हरिभाऊ फाकटकर, डॉ. निलेश उके यांच्यासह जवळपास ३०० सायकलस्वार यामध्ये सहभागी झाले. ‘स्वच्छ पुणे ग्रीन पुणे’, ‘माय क्लीन इंडिया’, ‘सायकल वापरा प्रदूषण टाळा’ अशा घोषणा देत प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा नारा या रॅलीतून देण्यात आला.डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला काही वेळ समाजासाठी द्यायला हवा. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात. पोलिसांसमोर अनेक समस्या आहेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा चांगला उपयोग होईल. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाने काही ठिकाणे निवडून तेथील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. शक्यतो सायकलींचाच वापर करावा, जेणेकरून रस्त्यावर मोठी वाहने येणार नाहीत आणि वाहतूक कोंडी होणार नाही. शिवाय वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही.’विद्यार्थी प्रेम मरगजे याने सूत्रसंचालन केले. प्रा. अपर्णा हंबर्डे यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी