विविध 22 सामाजिक संघटनांनी दर्शवला आघाडीला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 21:02 IST2019-04-16T20:55:36+5:302019-04-16T21:02:49+5:30
पुण्यातील विविध 22 सामाजिक संघटनांनी आघाडीला पाठिंबा दिला असून आघाडीच्या प्रचारात ते सहभाग घेणार आहेत.

विविध 22 सामाजिक संघटनांनी दर्शवला आघाडीला पाठिंबा
पुणे : पुण्यातील विविध 22 सामाजिक संघटनांनी आघाडीला पाठिंबा दिला असून आघाडीच्या प्रचारात ते सहभाग घेणार आहेत. पुण्यातील काँग्रेसभवन मध्ये सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी, माजी आमदार शरद रणपिसे, प्रवीण गायकवाड आणि या 22 संघटनांचे प्रतिनिधी उपस्तिथ होते.
अंधारे म्हणाल्या, भाजप कडून जी धार्मिक तेढ निर्माण केली जातेय ती रोखण्यासाठी, संविधानिक चौकट वाचवण्यासाठी या संघटनांनी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाठिंबा राज्यातील आघाडीच्या सर्वच उमेदवारांना असणार आहे.
लहुजी फौंडेशन, बहुजन सेना, लहुजी छावा संघटना, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, अशा 22 संघटनांनी आघाडीला पाठिंबा दिला आहे.
यावेळी शिवसेनेत गेलेल्या सचिन तावरे यांनी पुन्हा काँग्रेस मध्ये घरवापसी केली. कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.