पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:25 IST2025-06-08T14:22:10+5:302025-06-08T14:25:08+5:30

Pune Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ फिरतोय. हा व्हिडीओ आहे पिंपरी चिंचवडमधील. झाडाच्या खोडातून अचानक पाणी वाहायला लागलं आणि लोकांनी चमत्कार समजून चक्क पूजा करायला आणि दर्शन घ्यायला सुरूवात केली. पण, नंतर पाणी वाहण्याचं खरं कारण समोर आलं.

Superstition reaches its peak in Pune! Water started flowing from a tree in Pimpri Chinchwad, people worshipped and sought blessings; Video goes viral | पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...

पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...

Pimpri-Chinchwad News: एक व्हिडीओ ज्याने सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओमध्ये एका झाडाच्या खोडातून पाणी वाहताना दिसत आहे. अचानक झाडाच्या खोडातून पाणी वाहू लागल्याने लोकांना तो चमत्कार वाटला आणि पूजा करायला सुरूवात झाली. लोकांनी झाडाला हार घातले. पाया पडायला गर्दी होऊ लागली. पण, जेव्हा झाडातून पाणी वाहण्याचे कारण शोधण्यात आले. तेव्हा कथित चमत्काराचं पितळ उघडं पडलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो आहे पिंपरी चिंचवड शहरातील. प्रेमलोक पार्कमध्ये रस्त्याकडेला एक झाड आहे. त्या झाडाच्या खोडातून अचानक पाणी येऊ लागले. झाडाच्या खोडातून पाणी येत असल्याचे पाहून लोकांना तो चमत्कार वाटला. 

वाचा >>पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

अंधश्रद्धेचा कळस, लोकांनी झाडाची केली पूजा   

अचानक झाडातून पाणी का वाहायला लागलं, याचं कारण जाणून न घेता लोकांनी चमत्कार समजून पूजा करायला सुरूवात केली. झाडाला कुंकू हळद लावले. हार घातला. आणि झाडाचे दर्शन घेण्यासाठी गर्दीही झाली. पण, याबद्दल काही नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघा

झाडातून पाणी का वाहू लागले?

अचानक झाडातून पाणी वाहू लागल्याचे ऐकून महापालिका प्रशासनालाही आर्श्चय वाटले. अधिकारी कर्मचारी पाहणी केली. तेव्हा झाडाच्या खोडातून वाहत असलेल्या पाण्याचे खरे कारण समोर आले. झाडाच्या खालून पाईपलाईन गेलेली आहे. ती फुटली आणि पाणी खोडातून वाहू लागले. त्यानंतर या चमत्कार प्रकरणावर पडदा पडला. 

Web Title: Superstition reaches its peak in Pune! Water started flowing from a tree in Pimpri Chinchwad, people worshipped and sought blessings; Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.