शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

'संकल्प नशा मुक्ती' साठी सुनील शेट्टीची रविवारी पुण्यात दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2023 12:31 PM

संकल्प नशामुक्ती हा विशेष अभियानातून पोलीस गुन्हेगारांवर कारवाई, तरुणांचे प्रबोधन, आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन अशा ३ मुद्यांवर काम करत आहेत

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने  'संकल्प नशा मुक्ती'  अभियानाअंतर्गत रविवारी लोणावळा शहरात विशेष मॅरेथॉनचे आयोजन केले असून त्यामध्ये सिने अभिनेता सुनील शेट्टी सहभागी होणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी दिली.

लोणावळा शहरात पर्यटनाच्या निमित्ताने राज्यभरातील तरुणाई गर्दी करते त्याचाच गैरफायदा घेत येथे ड्रग्जचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे तो मुळासकट उपटून काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसानी पुणे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शानाखाली ' संकल्प नशामुक्ती'  हा विशेष अभियान राबवला आहे. त्यामध्ये गुन्हेगारांवर कारवाई, तरुणांचे प्रबोधन, आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन अशा तीन मुद्यांवर पोलिस काम करत आहेत. त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी हे ब्रॅड ॲम्बॅसिटर म्हणून इनिशियेटिव्ह घेत आहेत.

प्रबोधनाच्या कार्यक्रमांर्गत रविवारी (४ जून) रोजी हा लोणावळा शहरामध्ये हा मॅरेथॉन आयोजिली असून आहे. तीन गटामंध्ये ही स्पर्धा होत असून पहिल्या गट १६ ते १८. दुसरा गट १९ ते २५ आणि २५ च्या पुढे अशा गटात ही स्पर्धा होणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसाच्या वेबसाईरवर लिंक देण्यात आली असून जास्ती जास्त नागरिकानी यात सहभागी व्हावे असे आवाहन पलोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी केले.

सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे 

तरुणाईला लागलेली कीड म्हणजे ड्रग्ज आहे त्यातून त्यांची सुटका करणे आणि त्या व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून तरुणाइला रोखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसानी हा ' संकल्प नशामुक्ती' हे अभियान सुरु आहे त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी इनिशियेटिव्ह घेत आहेत आपण सर्वानीही यात सहभागी व्हावे आणि रविवारी होणाऱ्या दौड मध्ये सहभागी व्हावे. - अंकित गोयल, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण.

मॅरेथॉनसाठी मोफत रजिस्ट्रेशन (लिंक अशी)

येत्या रविवारी लोणावळा येथील दाउदी बोहरा ग्राउंड येथे सकाळी सहा वाजता ही मॅरेथॉन सुरु होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी टी शर्ट, रिफ्रेशमेंट देण्यात येणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वेब साईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असून रजिस्त्रेशन मोफत आहे. त्याची लिंक अशी - https://puneruralpolice.gov.in/

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMarathonमॅरेथॉनHealthआरोग्यSocialसामाजिक