शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

यंदाचा उन्हाळा अधिक कडक, निवडणूक प्रचारात अडसर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 6:05 AM

प्रचारात अडसर; सरासरी ०़५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता

पुणे : यंदा एप्रिल ते जून या हंगामात मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारतात सरासरीपेक्षा ०़५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ पश्चिम राजस्थानमध्ये हंगामातील सरासरीपेक्षा १ अंशाने तापमान जास्त असण्याची शक्यता आहे़ तसेच उष्ण झोनमध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे़ मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी या हवामान विभागाच्या उपविभागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता ४४ टक्के आहे़ कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातील बहुतांश भागात उमेदवारांना प्रचार करताना कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे.

भारतीय हवामान विभागामार्फत २०१६ पासून हंगामातील हवामानाचा दर तीन महिन्यांचा अंदाज देण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार एप्रिल ते जूनमधील हंगामातील तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाने जाहीर केला आहे़ त्यानुसार उत्तर, उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतातील हवामानाच्या उपविभागाव्यतिरिक्त अन्य हवामान विभागात दिवसाचे व रात्रीचे तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते १ अंशाने अधिक राहणार आहे़ हरियाना, चंदीगड, दिल्ली, पश्चिम व पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम व पूर्व राजस्थान, पश्चिम व पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक किनारपट्टी, उत्तर कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तेलंगणा या विभागात तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे़ तर अन्य विभागात तापमान सर्वसामान्य राहील़विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तापणारमराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात एप्रिल, मे व जून महिन्यात कडक उन्हाळा असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलElectionनिवडणूकTemperatureतापमान