शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पालकांनी मारहाण केल्याने मुख्याध्यापकाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 3:33 PM

डोणजे भागातील एका शाळेत सर्वांसमोर घडलेल्या या घटनेमुळे व्यथित होऊन मुख्याध्यापकाने कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली.

ठळक मुद्देतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल : मानसिक धक्क्यातून केले कृत्य 

पुणे : मुलीला शिक्षा केल्याने जाब विचारणाऱ्या पालकांनी शाळेत मारहाण केली़. डोणजे भागातील एका शाळेत सर्वांसमोर घडलेल्या या घटनेमुळे व्यथित होऊन मुख्याध्यापकाने कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली. २४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणात मुख्याध्यापकांच्या पत्नीने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक कावरे (वय ५३, रा. रश्मी हाऊस, लगड मळा, वडगाव खुर्द, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे. याप्रकरणी कावरे यांची पत्नी वर्षा कावरे (वय ४९) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वर्षा कावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ पारगे, पूजा पारगे, रोहिणी कुंभार, बाळासाहेब पारगे, सुवर्णा चव्हाण (सर्व रा. डोणजे गाव, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अशोक कावरे सिंहगड किल्लाच्या पायथ्यालगत असलेल्या डोणजे गावातील एका शाळेत मुख्याध्यापक होते. या शाळेतील मुलीला २४ सप्टेंबर रोजी शिक्षा केली होती. मुलीने ही बाब  पालकांना सांगितली़ तेव्हा पालक पारगे, कुंभार, चव्हाण शाळेत आले. त्यांनी शाळेत सर्वांदेखत कावरे यांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेमुळे इतकी वर्षे केलेल्या शिक्षकाच्या नोकरीवर धब्बा लागल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला़ अपमानित झालेल्या कावरे यांनी सिंहगड रस्ता भागातील कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली़. पतीच्या निधनानंतर आजारी पडल्याने त्यातून सावरल्यानंतर पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे वर्षा कावरे यांनी फिर्यादीत नमूद केले. कावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस