शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

गेल्या वर्षाच्या तुलनेत देशात यंदा साखर उत्पादनात १८ टक्क्यांची घट, उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 09:24 IST

यंदा उत्तर प्रदेशाने महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत ९२ लाख ८० हजार टन उत्पादन घेतले.

पुणे : देशातील साखर हंगाम जवळपास संपला असून, गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात १८ टक्क्यांनी अर्थात ५८ लाख टनांनी घट झाली. यंदा २५७.४० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्यावर्षी हेच उत्पादन ३१५.४० लाख टन इतके झाले होते. सरासरी साखर उताऱ्यातही ०.८० टक्क्यांनी घट होऊन यंदा केवळ ९.३० टक्के साखर उतारा मिळाला आहे. तसेच उसाचे गाळप ३५४ लाख टनांनी घसरून यंदा २ हजार ७६७ लाख टन ऊस गाळप झाला. यंदा उत्तर प्रदेशाने महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत ९२ लाख ८० हजार टन उत्पादन घेतले. महाराष्ट्रात ८० लाख ९५ हजार टन उत्पादन झाले आहे. उसाची घटलेली उपलब्धता आणि साखर उताऱ्यातील घट यामुळे प्रत्यक्ष साखर उत्पादन कमी झाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघाने दिली आहे.

यंदा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उत्पादनात सर्वाधिक घट झाली आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी ११० लाख २० हजार टन उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशात यंदा ९२ लाख ७५ हजार, तर गेल्यावर्षी १०३ लाख ६५ हजार टन उत्पादन झाले होते. तर कर्नाटकात ४० लाख ४० हजार टन व गेल्यावर्षी ५१ लाख ४० हजार टन उत्पादन झाले. या घसरणीमुळे हंगामाअखेर साखरेचे उत्पादन २६१ लाख १० हजार टन होण्याची अपेक्षा आहे. हंगामाच्या अखेरीस साखरेचा शिल्लक साठा सुमारे ४८ ते ५० लाख टन इतका होईल असा अंदाज आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी हा साठा पुरेसा असून येत्या हंगामात अनुकूल पावसाळी परिस्थिती व महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वाढलेल्या ऊस लागणीमुळे साखर उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे मत महासंघाने व्यक्त केले आहे.

इथेनॉलऐवजी साखरेला प्राधान्य

चालू हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी ३२ लाख टन प्रत्यक्ष साखर वळविण्यात येईल, असा अंदाज आहे. यापूर्वी इथेनॉलासाठी ३५ लाख टनांचे लक्ष ठेवले होते. ही घट प्रामुख्याने उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसेसपासून उत्पादित इथेनॉलच्या किमतीत सुधारणा न झाल्यामुळे आहे. कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या थेट साखर उत्पादन अधिक आकर्षक पर्याय बनल्यामुळेच ही घट झाली आहे. दरम्यान, एकूण उत्पादन कमी झाल्यामुळे आणि निर्यातीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे कारखान्यांकडील साखरेच्या किमती सध्या ३८८० ते ३९२० रुपये प्रतिक्विंटलच्या पातळीवर स्थिर आहेत. यामुळे संपूर्ण उद्योगात तरलतेत लक्षणीय वाढ होऊन कारखान्यांना हंगामाच्या केवळ सहा महिन्यांत एकूण १ लाख कोटी रुपयांच्या (९० टक्के) उसाच्या रकमेपैकी अंदाजे ९१ हजार कोटी रुपयांची देणी शेतकऱ्यांना देता आली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस