शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
7
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
8
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
9
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
10
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
11
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
12
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
13
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
14
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
15
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
16
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
17
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
18
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
19
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
20
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन

कोरोनामुक्तीनंतरही वर्षभर शारीरिक दुखण्यांचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:09 IST

पुणे : कोरोना बरा झाल्यानंतरही काही रुग्णांना श्वसनाशी संबंधित आजारांचा कायमस्वरुपी सामना करावा लागत आहे. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्याने ...

पुणे : कोरोना बरा झाल्यानंतरही काही रुग्णांना श्वसनाशी संबंधित आजारांचा कायमस्वरुपी सामना करावा लागत आहे. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्याने श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा येणे, झोपेचे चक्र बदलणे, तीव्र अंगदुखी अशी कोरोना पश्चात (पोस्ट कोव्हिड) लक्षणे मोठ्या प्रमाणात कोरोनामुक्त नागरिकांमध्ये दिसत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही रुग्णांना तीन महिन्यांपर्यंत ऑक्सिजनवर किंवा आयसीयूमध्ये ठेवावे लागत आहे. मात्र, ‘पोस्ट कोव्हिड’ त्रास वर्षभर मागे लागत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण खूप जास्त होते. बरेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसून आली. काहींना महिन्याभराहून जास्त काळ ‘आयसीयू’मध्ये किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली. कोरोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही फुप्फुसांच्या कार्यक्षमप्त गुंतागुंत निर्माण झाल्याने ऑक्सिजन द्यावा लागला आणि उपचारही सुरु ठेवावे लागले. मात्र, काही रुग्णांमध्ये महिन्याभरात तर काही रुग्णांमध्ये तीनचार महिन्यांमध्ये सुधारणा दिसून आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवल्याचे फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर यांनी सांगितले.

चौकट

कोरोनाचे एकूण रूग्ण - ४ लाख ८२ हजार ९१६

बरे झालेले रूग्ण - ४ लाख ७१ हजार २०९

सध्या उपचार घेत असलेले रूग्ण - ३ हजार ३३

एकूण बळी - ८ हजार ६७४

चौकट

‘पोस्ट कोविड’चा जास्त धोका ज्येष्ठ-सहव्याधीग्रस्तांना

ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता जास्त असल्याचे दिसून आले. उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना विषाणूजन्य आजारांची लागण मोठ्या प्रमाणात होते. मुख्यत:, सातत्याने थकवा येणे, श्वास घेताना दम लागणे, खोकला होणे, तीव्र अशक्तपणा, अतिवेदना, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे बऱ्याच काळापर्यंत दिसून येतात.

चौकट

“तीव्र कोरोना होऊन गेला असेल तर फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. यामुळे ‘पोस्ट कोव्हिड’ त्रास जाणवू शकतो. मात्र, ८०-९० टक्के रुग्णांमध्ये चार-पाच महिन्यांमध्ये पोस्ट कोव्हिड त्रास कमी होत जातो. १०-२० टक्के रुग्णांना जास्तीत जास्त एक वर्ष त्रास होऊ शकतो. अशा रुग्णांना एक-दोन महिने रक्त पातळ होण्याच्या गोळ्या दिल्या जातात. लंग फायब्रोसिस, फुफुसांना सूज येणे, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे, रात्री झोप न लागणे आणि दिवसा झोप येण्याचा त्रास जाणवतो. काही रुग्णांना अचानक ‘हार्ट अ‍ॅटॅक’ येण्याची उदाहरणेही आहेत. काहींमध्ये न्युमोथोरॅस अर्थात फुप्फुसातील हवा बाहेर पडण्याची गुंतागुंत निर्माण होते, ऑक्सिजनची गरज भासते. काही रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यावर दोन-तीन महिने रुग्णालयात देखरेखीखाली ठेवावे लागते. मात्र, वर्षभराहून जास्त काळ ‘पोस्ट कोव्हिड’चा त्रास होत नसल्याचे दिसून आले आहे.”

- डॉ. नितीन अभ्यंकर, फुप्फुसरोगतज्ज्ञ

चौकट

कोरोनातून बरे झाल्यानंतरही घ्या काळजी

* कोरोनातून बरे झाल्यावरही श्वसनाचे व्यायाम कायम ठेवावेत.

* हलका आणि सकस आहार घ्यावा.

* हलक्या स्वरुपाचे व्यायाम नियमितपणे सुरु ठेवावेत.

* कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा.

* औषधोपचार नियमितपणे घ्यावेत