शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

सुधा भारद्वाज यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 9:02 PM

शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आणले होते. याच अनुषंगाने देशभर पोलिसांचे धाडसत्र सुरू होते.

ठळक मुद्देपहिल्यांदाच भारद्वाज यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल अर्ज दाखल केला असून त्यावर ६ आॅक्टोबरला सुनावणी होणार

पुणे : सीपीआय या बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबध असल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल असलेल्या फरिदाबाद येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुधा भारद्वाज यांनी पुणे येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आणले होते. याच अनुषंगाने देशभर पोलिसांचे धाडसत्र सुरू होते. त्यात सुरुवातील एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर पी. वरवरा राव, व्हर्णन गोन्सालवीस आणि अरूण थॉमस फरेरा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होऊन राव,  गोन्सालवीस, फरेरा, नवलाखा आणि भारद्वाज यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पत्रकार गौतम नवलाखा यांनाही दिल्ली न्यायालयाने नजर कैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता. याप्रकरणी अंतिम आदेशात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नजरकैदेत चार आठवड्यांची वाढ केली आहे. तसेच त्यांना अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची मूभा असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच भारद्वाज यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. भारद्वाज यांच्या वतीने अ‍ॅड. युग चौधरी यांनी हा अर्ज दाखल केला आहे.  याप्रकरणात सर्वांत आधी अटक करण्यात आलेले अ‍ॅड. सुरेंद्र गडलींग, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत आणि शोमा सेन यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर ६ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिस