शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अचानक शेतातील झाडावर वीज कोसळली; आडोशाला बसलेल्या शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 19:17 IST

बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथील घटना

ठळक मुद्देघटनेने परीसरात हळहळ व्यक्त होतीये

बारामती : बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथील पणदरे खिंड जवळील शेतात काम करणाऱ्या शेतकरी दांपत्याचा वीजेने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला बसणे शेतकरी दांपत्याच्या जीवावर बेतले आहे.

बाळासाहेब बंडोबा घोरपडे  (वय ५४) व त्यांच्या पत्नी संगीता बाळासाहेब घोरपडे (वय ४४) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेत बाळासाहेब यांच्या दुसऱ्या पत्नी पद्ममिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तातडीने धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.

घोरपडे यांची पणदरे खिंडीजवळ शेतजमीन आहे. सोमवारी बारामती शहर आणि तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली. यावेळी शेतात काम करणारे हे तिघजण एका झाडाच्या आडोशाला बसले होते. याचवेळी अचानक वीजेचा मोठा कडकडाट होऊन वीज त्यांनी आसरा घेतलेल्या झाडावरच कोसळली. त्यात तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच बाळासाहेब यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर काही वेळातच संगीता यांचाही मृत्यू झाला.या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेDeathमृत्यूAccidentअपघातFarmerशेतकरीRainपाऊस