शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

असे प्रकार राष्ट्रवादीत खपवून घेतले जाणार नाहीत; मारहाणी प्रकरणावरून अजितदादांचा चांदेरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:12 IST

बाबुराव चांदेरेशी बोलून मारहाण केल्याबाबतचा जाब विचारणार आहे, त्या व्यक्तीने तक्रार दिली तर नक्की कारवाई होईल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त कृतीने राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. चांदेरे यांनी पुण्यात एका काल शनिवारी 25 जानेवारी ला नागरिकाला मारहाण केल्याची माहिती संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता, मारहाण झालेल्या व्यक्तीला डोक्यावर आणि गुडघ्याला जखम झाली होती. त्यानंतर आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. 

बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार मारहाण आणि शिवीगाळ या घटनामुळे बाबुराव चांदेरे चर्चेत येतात. एका नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, या घटनेनंतर अजित पवारांच्या पक्षासह बाबुराव चांदेरे यांच्यावर टीका केली जात आहे. या घटनेवरती अजित पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता, त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे. की, जो प्रकार झाला आहे, ते मला आवडलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.  बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसbusinessव्यवसायPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण