शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

पोलिसांच्या सांघिक कामगिरीचे यश

By admin | Updated: May 10, 2017 04:07 IST

नयना पुजारी खुन खटल्यातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ शहर गुन्हे शाखा आणि येरवडा पोलीस यांनी केलेल्या सांघिक कामगिरीचे हे यश आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नयना पुजारी खुन खटल्यातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ शहर गुन्हे शाखा आणि येरवडा पोलीस यांनी केलेल्या सांघिक कामगिरीचे हे यश आहे, असे तत्कालीन शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले़ ८ आॅक्टोबरला गुन्हा दाखल झाल्यानंतर येरवडा पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिट ४ समांतर तपास करीत होते़ या वेळी सहायक पोलीस निरीक्षक कारभारी हंडोरे, शौकत सय्यद, पोलीस कर्मचारी असलम अत्तार, शिवसुंदर, स्वामी या आमच्या पथकाने गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरुवात केली़ गुन्हा घडल्यानंतर १०व्या दिवशी यातील तीन आरोपींना पकडण्यात आम्हाला यश आले़ चौथा आरोपी स्वप्निल कदम हा अनेक महिने गायब होता़ तो मोहोळ -पंढरपूर रोडवर एका धाब्यावर थांबला असताना त्याला पकडण्यात आले़ याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटार, दुचाकी जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ४ने येरवडा पोलिसांना साह्य केले होते़ आज या गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्याने पोलिसांच्या सांघिक कामगिरीचे हे यश म्हटले पाहिजे़निकालाने पोलिसांची प्रतिमा उंचावलीपोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या योगेश राऊतला सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर पकडण्यात आमच्या पथकाला यश आले़ आजच्या निकालाने पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली, असे तत्कालीन दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी व्यक्तकेली़ योगेश राऊत पळाल्यानंतर गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली होती़ याविषयी गोवेकर यांनी सांगितले, की योगेश राऊत याच्याशी संबंधित अगदी लहानपणापासून असलेल्या मित्रांपासून त्याच्या सर्व जवळच्या लोकांची माहिती आमच्या पथकाने काढली़ अगदी तुरुंगात त्याच्याजवळ कोण होते, याचीही माहिती घेतली़ देवऋषीपासून डॉक्टरांपर्यंत संपर्क साधून त्याच्याविषयी काही माहिती मिळते का याचा शोध घेतला गेला़ तब्बल ६ महिने चिकाटीने केलेल्या प्रयत्नांनंतर योगेशची माहिती मिळाली व त्याला पकडण्यात यश आले़ आजच्या निकालाने समाजात योग्य संदेश गेला असून, पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे़ - सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक