शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अखेर रसवंती आंदोलनाला यश; जय महेशचे प्रशासन नमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:26 PM

ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना पवारवाडी (जि.बीड) आणि सावरगाव, तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या 'रसवंती आंदोलना'ला मोठे यश आले आहे.

पुणे : ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना पवारवाडी (जि.बीड) आणि सावरगाव, तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या 'रसवंती आंदोलना'ला मोठे यश आले आहे. साखर आयुक्त आणि जय महेश कारखान्याचे जनरल मॅनेजर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बीले आजपासून जमा होणार आहेत. येत्या 31 जानेवारी पर्यंत 15 डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बीले थकित रक्कम देण्यात येणार असल्याची लेखी हमी जय महेश कारखान्याने सोमवार रोजी दिली. शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.निलम गोऱ्हे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, मंगेश तिटकारे यांच्याशी सविस्तर चर्चा करुन योग्य शिष्टाई केली आणि पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गेली सात दिवस चालले. त्यामुळे या आंदोलनाला 100%यश मिळाले असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर गेले सात दिवस दिनांक 15 जानेवारी पासून माजलगाव मतदारसंघातील पवारवाडी, सावरगाव आणि तेलगाव येथील तीन साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुण्यातील साखर संकुलासमोर रसवंती थाटून हे अभिनव आंदोलन केले. या आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आणि शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह शेतकऱ्यांना साखर आयुक्त कार्यालयात चर्चेसाठी बोलावले. या चर्चेनंतर सोमवारी पिडीत शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व साखर आयुक्त यांच्यात समाधानकारक चर्चा होवून योग्य तोडगा निघाला.या आंदोलनाची दखल घेत तीन दिवसांपूर्वीच छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव(जि.बीड) आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव(जि.बीड) या दोन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या डिसेंबर अखेरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बीले देण्याबाबत तात्काळ निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर देखिल टाकले. मात्र जय महेश साखर कारखान्याने अडेलतट्टूपणाची भूमिका घेतल्यामुळे हे आंदोलन सोमवारपर्यंत सुरुच होते. मात्र अखेर साखर आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.निलम गोऱ्हे यांनी योग्य शिष्टाई करुन शेतकऱ्यांच्या वतीने आपली प्रभावी बाजू मांडली. साखर आयुक्त, साखर संचालक मंगेश तिटकारे, ज्ञानदेव मुकणे आणि आंदोलक यांच्यात झालेल्या शिष्टाईनंतर जय महेश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीष लोखंडे यांनी या प्रश्नी अधिकृत पत्र दिले आहे. जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने गिरीष लोखंडे यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, येत्या दिनांक 31 जानेवारीपर्यंत दिनांक 15 डिसेंबर 2018 पर्यंत गाळप झालेली शेतकऱ्यांची थकीत ऊसाची बीले देण्यात येतील अशी हमी दिली आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी योग्य शिष्टाई केल्याबद्दल त्यांचे शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.निलम गोऱ्हे, अप्पासाहेब जाधव, अॅड.दत्ता रांजवण यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा संघटक रामदास ढगे, वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने, मुंजाबा जाधव, आकाश खामकर, संदिप ढिसले, तिर्थराज पांचाळ, शिवाजी सावंत, माऊली शेंद्रे, सुखदेव धुमाळ, अनिल धुमाळ, ओंकार जाधव, विक्रम सोळंके, नामदेव सोजे, गणेश शिंदे, मुक्तीराम कापसे, मोंकीद बरबडे, गोविंद शेळके, कृष्णा कोळपे हे शेतकरी व शिवसैनिक सहभागी झाले होते. त्यांनी साखर आयुक्त व जय महेश साखर कारखान्याने दिलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

अखेर शिवसेनेच्या लढ्याला यश - आप्पासाहेब जाधवपिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण यापुढेही कार्यरत राहणार आहे. शेतकऱ्यांना त्यांची थकीत ऊस बीले मिळत आहेत याचे मला समाधान वाटते. सध्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव रस्त्यावर उतरु असा इशारा जाधव यांनी दिला आहे आणि शेतकरी व शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत तीनही साखर कारखान्याच्या प्रशासनाने दखल घेवून ऊस बीले देण्याबाबत निर्देश द्यावे लागले हे आंदोलनाचे फलित असून शिवसेनेच्या लढ्याचे अखेर यश आले आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने