शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

विद्यार्थ्यांना प्रतिक्षा विद्यापीठातील वसतिगृहाच्या यादीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 8:48 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या ५२८ तर मुलींच्या ४०८ खोल्या उपलब्ध आहेत. मागील वर्षी वसतिगृहामध्ये १ हजार ६७ मुलांना व १ हजार १२२ मुलींना अशा एकूण २ हजार १८९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : मागेल त्याला हॉस्टेल योजनाएकूण ५२ विभाग असून या विभागांच्या विद्यार्थी संख्येनिहाय लॉटरी पध्दतीने वसतिगृहातील खोल्यांचे वाटप नवीन वसतिगृहांच्या उभारणीची तातडीने गरज

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशासाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसमोर वसतिगृहातील खोल्यांचे वाटप होईपर्यंत कुठे रहायचे हा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे विभागांकडून जाहीर होणाऱ्या वसतिगृहातील प्रवेशाच्या यादीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही ‘मागेल त्याला वसतिगृह’ देण्याची योजना पूर्ववत राबविली जाण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या ५२८ तर मुलींच्या ४०८ खोल्या उपलब्ध आहेत. मागील वर्षी वसतिगृहामध्ये १ हजार ६७ मुलांना व १ हजार १२२ मुलींना अशा एकूण २ हजार १८९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. विद्यापीठामध्ये एकूण ५२ विभाग असून या विभागांच्या विद्यार्थी संख्येनिहाय लॉटरी पध्दतीने त्यांना वसतिगृहातील खोल्यांचे वाटप करण्यात आले आहे. सरासरी प्रत्येक विभागाला मुलांच्या दहा व मुलींच्या दहा खोल्या उपलब्ध झाल्या आहेत. त्या त्या विभागांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीतील क्रमांकाने या खोल्यांमध्ये प्रवेश द्यायचा आहे. त्यामुळे विभागांनी वसतिगृह प्रवेशाच्या याद्या त्वरीत जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.विभागांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन वसतिगृह मिळण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. या काळात बाहेरगावांहून आलेल्या विद्यार्थ्यांपुढे कुठे रहायचे हा प्रश्न निर्माण होतो. पूर्वी विद्यार्थी पॅरासाइट म्हणून मित्रांकडे राहू शकत होते, मात्र आता बायोमेट्रीक प्रणाली सुरू करण्यात आल्यानंतर पॅरासाइट म्हणून विद्यार्थ्यांची सोय होण्यात अडचणी येत आहेत. विशेषत: विद्यार्थींनीना मोठया अडचणींना सामोरे जावे लागते. यापार्श्वभुमीवर चलन भरून तात्पुरती राहण्याची विद्यार्थी व विद्यार्थींनीची सोय करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.वसतिगृहातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे येणारे अर्ज व प्रत्यक्ष उपलब्ध खोल्यांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. एका खोलीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येनुसार वसतिगृहांची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी स्टुडंन्ट फेडरेशन आॅफ इंडियाचे (एसएफआय) विद्यापीठ विभागाचे अध्यक्ष सतीश देबडे, उपाध्यक्ष अक्षय रघतवान यांनी कुलगुरूंकडे केली आहे.   .....................या विद्यार्थ्यांना प्राधान्याने द्यावे वसतिगृहसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राज्याच्या विविध भागांतून तसेच देशभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. त्यामध्ये विद्यार्थींनीना तसेच विशेषत: ग्रामिण भागातील, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने वसतिगृहात प्रवेश देण्याची मागणी एसएफआय संघटनेकडून करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय न झाल्यास प्रवेश रदद् करून घरी परत जाण्याचे प्रमाण मोठे असल्याचे एसएफआयचे अध्यक्ष सतीश देबडे यांनी स्पष्ट केले आहे.....................नवीन वसतिगृहांच्या उभारणीची तातडीने गरजसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मुलांसाठी ९ व मुलींसाठी ९ वसतिगृहांच्या इमारती आहेत. विद्यापीठातील विभागांची तसेच विद्यार्थ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढत गेली, त्या प्रमाणात वसतिगृहांची संख्या वाढलेली नाही. मुलींच्या वसतिगृहाची नवीन इमारत बांधण्यास मंजुरी मिळालेली आहे. त्याचबरोबर मुलांच्या पीएचडी वसतिगृहाच्या मान्यतेचे कामही अंतिम टप्प्यात आहे. ही वसतिगृहे बांधण्याची कार्यवाही तातडीने सुरू होण्याची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे............................जुन्या इमारतींच्या डागडुजीची गरजमुलांच्या वसतिगृह क्रमांक ५ मधील काही खोल्यांमध्ये गळती होत असल्याने दुरूस्तीसाठी हे वसतिगृह खाली करण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांची वसतिगृहाची गरज लक्षात घेऊन ते पुन्हा वापरात आणण्यात आले आहे. मुलांच्या वसतिगृह क्रमांक ५ बरोबरच वसतिगृह क्रमांक १, २ व ६ च्या इमारतीही खूप जुन्या झाल्या आहेत. या इमारती खाली करून त्या ठिकाणी नवीन इमारतींची उभारणी करावी लागणार आहे. त्याबाबतचे नियोजन व जुन्या इमारतींची डागडुजी तातडीने करण्याची आवश्यकता आहे.

    

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी