विद्यार्थ्यांनो, पीएमपीकडे वळा;  बसचे मार्ग, पास सवलतीच्या माहितीची जनजागृती 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 07:29 PM2020-02-15T19:29:24+5:302020-02-15T19:29:39+5:30

विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी पीएमपीकडून जनजागृती केली जाणार

Students, turn to PMP; Awareness of bus routes, pass discount information | विद्यार्थ्यांनो, पीएमपीकडे वळा;  बसचे मार्ग, पास सवलतीच्या माहितीची जनजागृती 

विद्यार्थ्यांनो, पीएमपीकडे वळा;  बसचे मार्ग, पास सवलतीच्या माहितीची जनजागृती 

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या मासिक ७५० रुपयांचा विद्यार्थी पास उपलब्ध

पुणे : प्रवाशांना बससेवेकडे वळविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नुकताच बस डे साजरा करण्यात आला. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही बसने प्रवास करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालयांमध्ये परिसरातून जाणाऱ्या बसचे मार्ग, पास सवलतीच्या माहितीचे फलक लावण्यात येणार आहे. तसेच पीएमपीचे कर्मचारीही महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करतील. 
पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये अनेक महाविद्यालये असून विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यातील अनेक विद्यार्थी बसचा वापर करतात. तर अनेक विद्यार्थी दुचाकीने महाविद्यालयात येतात. या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी पीएमपीकडून जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून दिला जातो. सध्या मासिक ७५० रुपयांचा विद्यार्थी पास उपलब्ध आहे. पीएमपीच्या बसची स्थिती आता सुधारू लागली आहे. ई-बससह नवीन सीएनजी बस ताफ्यात दाखल होत आहेत. महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनाही सुरक्षितपणे प्रवास करता येत आहे. सुरक्षित व आरामदायी सेवेमुळे या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे खासगी वाहनाचा वापर न करता विद्यार्थी तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनीही बसचा वापर करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
याविषयी माहिती देताना वाहतुक व्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ताफ्यामध्ये नवीन बस दाखल होत आहे. पासची सवलत असल्याने विद्यार्थ्यांना कमी खर्चात बससेवा उपलब्ध होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसने प्रवास करावा, यासाठी जनजागृती केली जाणार आहे. सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी पत्रव्यवहार केला जात आहे. आवारामध्ये विद्यार्थ्यांना आवाहन करणारे फलक लावले जातील. तसेच त्यावर महाविद्यालय परिसरातील थांबे व तेथून जाणाऱ्या बसची माहिती दिली जाईल. पास सवलतीचा उल्लेखही त्यावर केला जाणार आहे. पास विभागाचे कर्मचारी काही महाविद्यायांमध्ये पास कामासाठी जातात. त्यांच्यामार्फतही जनजागृती केली जाणार आहे.
------------

Web Title: Students, turn to PMP; Awareness of bus routes, pass discount information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.