शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धांदल

By admin | Updated: June 12, 2015 06:06 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी विद्यार्थी, तसेच पालकांची धावपळ सुरू आहे. योग्य कागदपत्रे मिळाल्यानंतर

पिंपरी : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी विद्यार्थी, तसेच पालकांची धावपळ सुरू आहे. योग्य कागदपत्रे मिळाल्यानंतर त्याची तपासणी करून घेण्यासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालय आणि केंद्रात फेऱ्या माराव्या लागत आहेत. वेळखाऊ संथ प्रक्रिया आणि धांदल यामुळे विद्यार्थी आणि पालक जाम वैतागले आहेत. पहिल्या टप्प्यातील अपूर्ण राहिलेली माहिती भरली जात आहे. अर्जाची प्रिन्ट काढल्यानंतर त्याला आवश्यक कागदपत्रे जोडली जात आहेत. या कागदपत्रांचा संच संबंधित केंद्रातून तपासून घेतल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण होत आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ही नोंदणी घरी किंवा सायबर कॅफेत केली जात आहे. त्याची प्रिन्ट पुन्हा संबंधित केंद्रात तपासली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज कन्फर्म करून सबमिट केला जात आहे. जातीचा दाखला, गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, शिफारसपत्र आदीसाठी विद्यार्थी व पालकांना धावपळ करावी लागत आहे. महाविद्यालयांत सकाळच्या वेळेत प्रवेशप्रक्रिया सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची रांग लागते. कागदपत्रे तपासून घेणे, शंका व अडचणी विचारण्यासाठी शिक्षकांना भेटावे लागते. संगणक कक्षात अधिक विद्यार्थी असल्याने बराच वेळ ताटकळावे लागते. अंतिम अर्जावर प्राचार्यांची स्वाक्षरी घ्यावी लागते. कागदपत्रे आणि दाखल्यांच्या झेरॉक्स काढून घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पाऊस आणि उन्हातील गैरसोय सहन करीत विद्यार्थ्यांना केंद्र आणि कनिष्ठ महाविद्यालय अशा अनेक चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची कसरत होताना दिसत आहे. चुकीच्या केंद्रात आल्यास विद्यार्थ्यांना हेलपाटा पडत आहे. अनेक केंद्रांवर संबंधित शिक्षक किंवा पर्यवेक्षक बैठक तसेच, इतर कामात व्यस्त असल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. संबंधित शिक्षक येईपर्यंत त्यांना नाइलाजास्तव वाट पाहत थांबावे लागत आहे. याबद्दल अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली.