शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थीच ‘अनभिज्ञ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 04:22 IST

विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे प्रशासनाचा काणाडोळा; सेमिस्टर सुरू पण माहिती मिळेना

पुणे : शैक्षणिक वर्षामधले तिसरे सेमिस्टर सुरू होऊनही फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या सिनेमॅटोग्राफी विभागातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहिती दिलेली नाही, त्यामुळे सेमिस्टरमध्ये काय शिकविले जाणार आहे, याबाबत विद्यार्थीवर्गच ‘अनभिज्ञ’आहे. एफटीआयआयच्या संचालकांना निवेदन देऊनही कोणतेच उत्तर दिले गेले नसल्याने विद्यार्थ्यांनी संचालकांच्या कार्यालयासमोर याचा निषेध नोंदविला.एफटीआयआय प्रशासनाने नवीन अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर शिक्षणपद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्याकरिता काही बदल केले. त्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरनंतर सर्व विभागाच्या प्राध्यापकांच्या शिकविण्याच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांकडून फिडबॅक देणारी यंत्रणा विकसित केली आहे. त्यानुसार शैक्षणिक कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांकडून हा फिडबॅक घेतला जातो. सेमिस्टर पद्धत लागू करूनही विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. दरम्यान यासंदर्भात सिनेमॅटोग्राफी विभागप्रमुख प्रसन्न जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला.तिसरे सेमिस्टर सुरू; अपुरी साधनसामुग्री उपलब्धशिक्षकांचे अभ्यासक्रमाबाबत नियोजन नसणे, शिकविण्याच्या संकल्पना स्पष्ट नसणे, विषयांतर करून बोलणे अशा स्वरूपाच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यामुळे २०१६ आणि २०१७ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या दुसरे सेमिस्टरच्या पूर्ततेनंतर फिडबॅकवरच ‘रोख’ लावण्यात आला. आता तिसरे सेमिस्टर सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यातच विद्यार्थ्यांना अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे दिवस आणि रात्रपाळीमध्ये प्रॅक्टिकल्स पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.ज्याप्रमाणे दिवसा काम करताना चित्रकला, सुतारकाम किंवा इतर गोष्टी मिळतात, त्या रात्रपाळीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत का? सध्या जे कॅमेरे आहेत ते वरिष्ठ विद्यार्थ्यांना शूटसाठी देण्यात आले आहेत, मग आम्हाला कोणते कॅमेरे किंवा लाईटिंग युनिटस उपलब्ध करून दिले जाणार? असे अनेक प्रश्न सिनेमॅटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी संचालकांसमोर निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत.संचालक भूपेंद्र कँथोला यांच्याकडून कोणतीही उत्तरे देण्यात आलेली नाहीत. यासाठी विभागातील दहा विद्यार्थ्यांनी विस्डम ट्री बाहेर आंदोलन केले. मात्र संचालकांनी दहा विद्यार्थ्यांशी बोलण्यास नकार दिला. केवळ दोन विद्यार्थ्यांनाच भेटता येईल, अशी अट टाकली, विद्यार्थी भेटले असता विभागप्रमुखांशी बोलावे, असे सांगण्यात आले.विद्यार्थ्यांचे निवेदन विभागप्रमुखांकडे पाठविले आहे. विद्यार्थ्यांना काय सांगायचे, यात मला पडायचे नाही. विभागप्रमुख पाहून घेतील.- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

टॅग्स :FTIIएफटीआयआयStudentविद्यार्थीEducationशिक्षण