शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दारु पिऊन पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा गाेंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 11:49 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील वसतीगृहात काही विद्यार्थ्यांनी दारु पिऊन गाेंधळ घातला.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक 9 मध्ये रविवारी रात्री काही विद्यार्थ्यांनी दारु पिऊन गाेंधळ घातल्याची घटना समाेर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाला ही बाब समजताच विद्यार्थ्यांना पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न समारे आला आहे. 

रविवारी रात्री उशीरा विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक 9 मध्ये विद्यार्थ्यांनी दारु पिऊन गाेंधळ घातला. ही बाब काही विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना तसेच विद्यापीठ प्रशासनाला सांगितली. सुरक्षारक्षकांनी दारु पिणाऱ्या विद्यार्थ्यांना खाेलीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी दरवाजा न उघडल्याने त्यांनी खाेलीच्या काचा फाेडून विद्यार्थ्यांची अवस्था पाहिली. त्यानंतर दरवाजा ताेडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आतील विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडला. सुरक्षारक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची मेडीकल चाचणी केली. त्यानंतर त्यांना पाेलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. 

दरम्यान विद्यापीठाच्या वसतीगृहामध्ये दारु पिण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यापुर्वी देखील विद्यापीठ प्रशासनाने दारु पिणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडून त्यांना समज दिली हाेती. परंतु सातत्याने असे प्रकार झाल्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पाेलिसांच्या हवाली केेले. रात्री उशीरा हा प्रकार घडल्याने वसतीगृहात गाेंधळाचे वातावरण हाेते. सुरक्षारक्षकांनी  विद्यार्थ्यांना शांत केले. या प्रकारामुळे वसतीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न समाेर आला आहे. 

विद्यार्थ्यांवर हाेणार निलंबनाची कारवाई सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या होस्टेल क्र. ९ मधील एका खोलीत विद्यार्थी दारू पीत आहे, असा फोन (२२ फेब्रुवारी) रात्री ११ वाजता सुरक्षा विभागाला आला. त्यावरून सुरक्षा विभागाचे कर्मचारी व होस्टेलचे अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी संबंधित विद्यार्थ्याला पोलिसांच्या हवाली केले. संबंधित विद्यार्थ्यावर निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, होस्टेलच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.- कुलसचिव 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठPoliceपोलिसStudentविद्यार्थी