शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा मागे घेण्यासाठी निरगुडसर येथून विद्यार्थ्याचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 14:05 IST

अपहरण झालेल्या आर्यनचे वडील विक्रम गोरक्षनाथ चव्हाण (रा. निरगुडसर) यांनी फिर्याद दिली आहे.

निरगुडसर : संगमनेर पोलिस ठाण्यात तरुणाच्या विरोधात आईने दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी बारा वर्षीय मुलाचे शाळेच्या मैदानातून अपहरण करण्यात आले. आर्यन विक्रम चव्हाण (वय १२) असे त्याचे नाव आहे. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे घडली. याप्रकरणी राजू जंबूकर (वय २६, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) याच्यावर पारगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या आर्यनचे वडील विक्रम गोरक्षनाथ चव्हाण (रा. निरगुडसर) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, माझी पत्नी अर्चना हिने एका प्रकरणात जंबूकर याच्याविरोधात संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी जंबूकरने माझा मुलगा आर्यनचे तो शिक्षण घेत असलेल्या निरगुडसर गावच्या हद्दीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातून बुधवारी (दि. ११) दुपारी साडेबारा वाजता आमिष दाखवून पळवून नेले. आर्यन हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. त्याला शाळेतून पळवून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.अपहरण झालेल्या आर्यन चव्हाणचे वर्णन पुढीलप्रमाणे :- वय १२, बांधा सडपातळ, रंगाने गोरा, उंची ४ फूट, केस लहान, काळे, अंगात शाळेचा युनिफॉर्म, निळ्या रंगाची पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा व त्यावर निळ्या रंगाच्या चौकटी असलेला हाफ बाह्यांचा शर्ट, पायात सॅन्डल, शिक्षण ५ वी, मराठी भाषा बोलतो. जंबूकर याच्यावर संगमनेर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मागावर पारगाव पोलिस आणि एलसीबीची पथके आहेत. लवकरच त्याला अटक केले जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय