शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हंचिंग शाळेने विद्यार्थ्याला केले पाचवीत नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 20:47 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला ८ वीपर्यंत नापास करता येत नाही, तरीही शाळेने विद्यार्थ्याला घरी बसविले.

ठळक मुद्देशिक्षणमंत्र्यांकडे तक्रार : ८ दिवसांमध्ये कारवाई करणारअल्पसंख्याक असल्याने कायदा लागू होत नसल्याचा दावा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला इयत्ता आठवीपर्यंत नापास करता येत नाही. मात्र, हचिंग शाळेने इयत्ता ५ वीमधील विद्यार्थ्याला नापास केल्याची तक्रार त्याच्या पालकांनी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोमवारी (दि. २जुलै ) केली. तावडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत येत्या ८ दिवसांमध्ये या शाळेविरूध्द कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.बालभारतीच्यावतीने विनोद तावडे यांच्याहस्ते दिक्षा अ‍ॅपच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तावडे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधला. यावेळी पालक शैलेश शिंदे यांनी त्यांच्या मुलाला हचिंग शाळेने इयत्ता आठवीमध्ये नापास केले असल्याची कैफियत मांडली. यावेळी तावडे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती द्या, चौकशी करून येत्या ८ दिवसात त्या शाळेविरूध्द कारवाई करतो असे सांगितले.शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला ८ वीपर्यंत नापास करता येत नाही, तरीही शाळेने शिंदे यांच्या मुलाला घरी बसविले. त्यामुळे त्याचे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसान झाले आहे. तो चांगला फुटबॉलपटू आहे. पण शाळेने जाणीवपूर्वक त्याला नापास करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर तावडे  यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून त्या शाळेविरूध्द कारवाई करण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या...........अल्पसंख्याक असल्याने कायदा लागू होत नसल्याचा दावाहचिंग शाळा ही अल्पसंख्याक असल्याने या शाळेला शिक्षण हक्क कायदा लागू होत नाही. त्यामुळे शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येऊ शकते असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, अल्पसंख्यांक शाळांनाही शिक्षण हक्क कायदा लागू होतो असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. अनेक शाळा अल्पसंख्यांक असल्याचे सांगून आरटीई अंतर्गत प्रवेश न देणे, आरक्षण न पाळणे अशा बेकायदेशीर कृत्ये करत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकStudentविद्यार्थीVinod Tawdeविनोद तावडे