स्पर्धा परीक्षेत अपयश आलेल्या तरुणाने सुरु केला व्यवसाय ; वर्षात फेडले कुटुंबावरील कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 07:28 PM2019-12-12T19:28:37+5:302019-12-12T19:30:13+5:30

सर्धा परीक्षेमध्ये अपयश आलेला सुशील सध्या व्यवसाय करत असून त्याला व्यवसायात माेठा नफा हाेत आहे.

student fail in competitive exam started his own business | स्पर्धा परीक्षेत अपयश आलेल्या तरुणाने सुरु केला व्यवसाय ; वर्षात फेडले कुटुंबावरील कर्ज

स्पर्धा परीक्षेत अपयश आलेल्या तरुणाने सुरु केला व्यवसाय ; वर्षात फेडले कुटुंबावरील कर्ज

googlenewsNext

पुणेःपुणे शहराचा फेरफटका मारला तर लाखाे तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचे आढळून येतील. खासकरुन पेठांच्या भागांमध्ये गेलात तर नाक्यानाक्यावर माेठमाेठाली पुस्तकं घेऊन स्पर्धा परीक्षांच्या गप्पांमध्ये रमलेले तरुण पाहायला मिळतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखाे असतात आणि दरवर्षी अवघ्या 100 ते 200 जागा निघतात. अशात अनेकांना वर्षानुवर्षे अपयश येते आणि ते तरुण खचून जातात. अशा तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेकडून व्यवसायाकडे वळालेला सुशील काटकर हा एक आशेचा किरण ठरत आहे. 

सुशील मुळचा बीडचा. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आला हाेता. घरची परीस्थिती तशी हलाखीचीच. त्यातच कुटुंबावर 15 लाखांचं सावकाराच कर्ज. मुलगा पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करुन सरकारी नाेकरी मिळवेल आणि आपलं कर्ज फेडेल अशी आशा कुटुंबियांना हाेती. अनेक प्रयत्नानंतरही सुशीलला स्पर्धा परीक्षेमध्ये यश आले नाही. गावी कुटुंबावर कर्जाचा डाेंगर वाढतच हाेता. वडीलांच्या, आईच्या आजरपणावर उपचार करण्यासाठी सुद्धा सुशीलकडे पैसे नव्हते. वडीलांना नैराश्याने ग्रासले हाेते. आत्महत्या करण्यापर्यंत त्यांचे विचार गेले हाेते. तर इकडे वडीलांच्या डाेक्यावरील कर्ज फेडण्यासाठी प्रसंगी गुन्हेगारी कृत्य करण्याचे विचार सुशीलच्या मनात येत हाेते. 

स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्युवहातून आपण बाहेर पडून व्यवसाय सुरु करुया असे एकेदिवशी सुशीलने ठरवले. मित्र मंडळी आणि त्यांला स्पर्धापरीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांकडून त्याने पैसे उसने घेत फूड स्टाॅल टाकण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील सदाशिव पेठेतील नागनाथ पार येथे एक छाेटेसे दुकान भाड्याने घेत त्याने हाॅटेल व्यवसाय सुरु केला. चहा, नाश्ता आणि पुलाव असे पदार्थ त्याने आपल्या हाॅटेलमध्ये ठेवले. पाहता पाहता अवघ्या वर्षभरात त्याने आपल्या वडीलांना कर्जमुक्त केले. सध्या ताे महिन्याला लाखभर रुपये व्यवसायातून मिळवत आहे. 

सध्या सुशील त्याचा व्यवसाय उत्तमपणे सांभाळत असून त्याला चांगला नफा हाेत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना प्लॅन बी नक्की तयार ठेवा असाच संदेश ताे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना देत आहे. 

Web Title: student fail in competitive exam started his own business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.