बुडत्या काँग्रेसच्या आधाराने सेना वाचविण्याची धडपड: मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 14:40 IST2022-10-01T14:39:17+5:302022-10-01T14:40:02+5:30

बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार...

Struggle to save the army on the basis of sinking Congress: Muralidhar Mohol | बुडत्या काँग्रेसच्या आधाराने सेना वाचविण्याची धडपड: मुरलीधर मोहोळ

बुडत्या काँग्रेसच्या आधाराने सेना वाचविण्याची धडपड: मुरलीधर मोहोळ

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून, बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यास गर्दी जमविण्यासाठी काँग्रेसने कार्यकर्ते पुरविण्याच्या मोबदल्यात, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातील शिल्लक सेनेची कुमक पुरविण्याची ठाकरे यांची धडपड केविलवाणी आहे. यातून पेंग्विन सेनेने हिंदुत्वाशी कायमची फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दसरा मेळाव्याकरिता गर्दी जमविण्याचे अभूतपूर्व आव्हान ठाकरे यांच्यासमोर उभे आहे. त्यामुळे उरल्यासुरल्या पेंग्विन सेनेच्या आवाक्याबाहेरच्या या आव्हानास सामोरे जाऊन, लाज वाचविण्यासाठी ठाकरे यांची जोरदार धडपड सुरू आहे, असे मोहोळ म्हणाले.

Web Title: Struggle to save the army on the basis of sinking Congress: Muralidhar Mohol