शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पाऊस

By admin | Updated: June 25, 2015 03:25 IST

कऱ्हा नदी खळाळली, इंद्रायणीला पूर, गुंजवणी दुथडी, मुळशीत वीजपुरवठा खंडित, वेल्ह्यात जनजीवन विस्कळीत

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून जुन्नर, खेड, आंबेगाव, तसेच पुरंदर, वेल्हा व भोर, मुळशी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. इंद्रायणी, नीरा, गुंजवणी या नद्यांना पूर आले आहेत. जोरदार पावसामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुरंदरमधील ओढे, नाले खळाळू लागले आहेत. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. आंबेगाव तालुक्यात बटाट्याच्या लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. मार्गासनी : वेल्ह्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असुन भात खाचरांना नदीचे स्वरुप झाले आहे. लावलेली भातरोपे वाहुन गेली असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विविध ठिकाणी शेतीचे बांध फुटलेले असुन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वादळाने मांगदरी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळली आहे.अंगणवाडीच्या इमारतीचे पत्रे उडाले असुन इमारतीत पाणी साठले आहे. तर येथील शेतकरी सागर तानाजी मांगडे यांचा जनावरांचा गोठा पडला असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंजाई आसनी येथील जयवंत किसन माने, भाऊ महादु माने, तर कोळवडी येथील निवृत्ती कृष्णा चोरघे यांच्या घरांची पडझड झाली असुन या झालेल्या घराच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे व्हावेत, अशी मागणी येथील नागरीक करीत आहेत. दरम्यान मुळशी, मावळ व खेड तालुक्यात गेले दोन दिवसांत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुळशी तालुक्यातील ८ गावे अंधारात आहेत. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून पुंडलिकाचे मंदिर पाण्यात होते.