छातीला हात लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 16:47 IST2017-10-23T16:42:43+5:302017-10-23T16:47:45+5:30

छातीला हात लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादामध्ये एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जनता वसाहत, पर्वतीत उघडकीस आला.

Striking a hand on the chest | छातीला हात लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर कोयत्याने वार

छातीला हात लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर कोयत्याने वार

ठळक मुद्देछातीला हात लागण्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा पर्वतीत प्रयत्न दत्तवाडी पोलीस ठाण्यात नऊ आरोपींसह एका महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : केवळ छातीला हात लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादामध्ये एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. जनता वसाहत, पर्वती येथील जय भवानीनगर मध्ये  रात्री ११.३०च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात नऊ आरोपींसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अविनाश अशोक उमाप (वय ३१, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाप आणि आरोपी हे शेजारी राहातात. उमाप यांचे पत्नीबरोबर घरगुती वाद चालू असताना आरोपी सुनील याने त्यांना काय चालले आहे, असे विचारल्यानंतर उमप घराबाहेर येत असताना त्यांचा हात सुनील यांच्या छातीला लागला. या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. आरोपीने इतर साथीदारांसह उमप यांच्या घरात घुसून त्यांना हाताने मारहाण केली. भांडणे सोडवायला आलेल्या फिर्यादीच्या नातेवाईकांना देखील दगडाने, विटांनी मारहाण केली. फिर्यादीच्या डोक्यात कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या भावाच्या डोक्यातही दगड, विटाने वार करून जखमी केले. पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक डफळ पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Striking a hand on the chest