Pune News: ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 12:32 IST2022-01-01T12:31:04+5:302022-01-01T12:32:23+5:30
शहर आणि जिल्ह्यात कोरांना विषाणूचा प्रसार ओमायक्रॉन व्हेरिएंटसह अत्यंत वेगाने होत आहे

Pune News: ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध
पुणे : जिल्ह्यात ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येलाच जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत सर्वत्र पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले आहेत.
शहर आणि जिल्ह्यात कोरांना विषाणूचा प्रसार ओमायक्रॉन व्हेरिएंटसह अत्यंत वेगाने होत आहे. कोरोना विषाणू तसेच ओमायक्रॉनचा प्रसार होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पर्यटन, लग्नसराई, राजकीय तसेच धार्मिक
नवीन वर्षांपासून जिल्ह्यात हे असतील निर्बंध
- खुल्या अथवा बंदिस्त जागेमध्ये विवाह व त्याचे अनुषंगाने इतर कार्यक्रम समारंभाप्रसंगी उपस्थितांचा अधिकतम मर्यादा ५० राहील.
- कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक राजकीय किंवा धार्मिक समारंभप्रसंगी खुल्या अथवा बंदिस्त जागेमध्ये उपस्थितांची अधिकतम मर्यादा ५० इतकी राहील. अंत्यविधी व त्याअनुषंगाने कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थिताची संख्या २० पेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
- जिल्ह्याच्या कोणत्याही पर्यटनस्थळे, मोकळी मैदाने गर्दी करू नये.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.