शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

By admin | Updated: January 26, 2015 01:36 IST

येथील पोलीस ठाण्यास हद्दीचा वाद न करता गुन्हे नोंदवून घ्यावेत, रेल्वे स्टेशन परिसरात लुटमार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी

कामशेत : येथील पोलीस ठाण्यास हद्दीचा वाद न करता गुन्हे नोंदवून घ्यावेत, रेल्वे स्टेशन परिसरात लुटमार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच रेल्वे परिसर आणि शहरातील अवैध धंदे बंद करावे. यासाठी शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी शहरात कडकडीत बंद पाळून पोलीस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. आरोपींना अटक झालीच पाहिजे, हप्तेबाजी बंद करा, गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे असा नारा देत नागरिकांनी रेल्वे स्थानकापासून पोलीस स्थानकापर्यंत मोर्चा काढला. आमदार संजय भेगडे, माजी सभापती राजाराम शिंदे, माऊली शिंदे, भरत मोरे, सुकन बाफना, तानाजी वाघवले, विलास भटेवरा, रमेश लुणावत, प्रतिक टाटिया, सुभाष रायसोनी, महेंद्र ओसवाल, पृथ्वीराज गदिया, करण ओसवाल, रोहिदास वाळुंज, शहरातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. शहरातील अवैध धंदे गुन्हेगारीला खत पाणी घालीत असल्याचा रोष आंदोलनकर्त्यांत होता. मागील आठ दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोळीकडून मारहाण केली जात असून मौल्यवान वस्तु बळकविण्याचा प्रयत्न केला जातो. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास लोणावळावरून अक्षय प्रवीण सोलंकी, बबलु संजय सोलंकी, शुभम कांतीलाल जन्ौ व हर्षल ललित गदिया हे चार तरूण कामशेत रेल्वे स्टेशनला उतरले. रेल्वेपुलावरून जाताना पायात डोके ठेवून झोपेचे सोंग घेतलेला तरुण या चार तरुणांना धमकावून त्यांच्या मागे दगड घेऊन धावला. त्या तरुणाचे इतर सहकारीही धावून आले. त्यांना प्रवाशांना मारहाण केली. त्यात अक्षयच्या डोक्यात दगड मारला असून त्यात तो जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रवाशांना लुटणाऱ्या या टोळीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करायला गेलेल्या पोलिसांनी हद्दीच्या वादावरून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर अवैध धंद्यामुळे अशा प्रकारात वाढ होत असून शहरातील अवैध धंदे बंद करावे यासाठी सकाळपासून व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.माजी सरपंच माऊली शिंदे म्हणाले, ‘‘दोन वर्षापूर्वी शहरात अवैध धंदे नव्हते. सध्या मात्र दारू, गांजा, चरस, मटका, क्लब असे धंदे सुरू असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे. सातबाराच्या केसेसमध्ये पोलिसांनी अधिक लक्ष देतात. पोलिसांनी सर्वसामान्यांना संरक्षण द्यावे.रोहिदास वाळुंज यांनी स्वतंत्र पोलीस ठाण्याकडे लक्ष वेधले. स्वतंत्र पोलीस स्टेशन झाल्यावर पोलिसांची संख्या वाढले. पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी रात्री दोन संशयितांना पकडले असून, त्याची चौकशी सुरू आहे.(वार्ताहर)