शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पर्वती दर्शनमध्ये तणावपूर्ण शांतता

By admin | Updated: July 9, 2015 04:41 IST

पर्वती दर्शन येथे मंगळवारी दोन गटांत झालेल्या दगडफेक आणि मारामारीच्या प्रकारानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून, याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे : पर्वती दर्शन येथे मंगळवारी दोन गटांत झालेल्या दगडफेक आणि मारामारीच्या प्रकारानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून, याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटांतील एकूण १३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. दुचाकीचे पार्किंग करीत असताना, डोळ्यांवर हेडलाइटचा प्रकाशझोत पडल्यामुळे झालेल्या किरकोळ वादावादीमधून दोन गटांत दंगल उसळल्याचे रामानंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रतेज महादेव सूर्यवंशी (वय २४), नवतेज महादेव सूर्यवंशी (वय १९), जावेद सलीम शेख (वय २१), मोहसीन आसीफ शेख (वय २०), सुभान अब्दुल रहमान कुरेशी (वय ४२), अफजल रईस अन्सारी (वय २०), शाहबाज अख्तर खान (वय २१), समीर मैनुद्दीन सय्यद (वय २०), नदीम सलीम नायब (वय २५, सर्व रा. पर्वती दर्शन) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमध्ये दोन्ही गटांतील एकूण १२ जण जखमी झाले आहेत. यातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक सहायक पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. एकूण ११ रिक्षा, २१ दुचाकी, ९ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून, १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)

महिलांच्या तक्रारींसाठी विशेष पथक1सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी हवेमध्ये केलेला गोळीबार योग्यच होता. त्यांनी जर गोळीबार केला नसता, तर जमावाला नियंत्रित करणे शक्य झाले नसते. त्यामधून अनेकजण जखमी होण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी शारीरिक हानी टळली. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता, असे सह आयुक्त सुनील रामानंद म्हणाले. 2ज्या महिलांनी आपल्याशी छेडछाड आणि अश्लील वर्तन झाल्याच्या तक्रारी दिलेल्या आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी महिला साह्य कक्षाच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांचे एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाद्वारे या घटनांचा स्वतंत्र तपास करण्यात येत असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही रामानंद म्हणाले.3शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहराची शांतता बिघडू देणार नाही. आतापर्यंत ‘बेसिक पोलिसिंग’द्वारे उत्तम कामगिरी करण्यात आली आहे. एमपीडीए अंतर्गत दोन गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. आणखी दहा ते बारा गुन्हेगारांवर कारवाई होणार आहे, तर ५० पेक्षा अधिक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर मोका लावण्यात आला आहे.