पुण्यासह राज्यातील परिवहन संवर्गगातील वाहनाचे थांबले पासिंग; 'रिफ्लेक्टर'चा मोठा तुटवडा निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 09:48 PM2021-06-09T21:48:15+5:302021-06-09T22:27:19+5:30

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याचे भाव वाढविण्यात आहे.

Stopped passing of transport vehicles in the state including Pune; Large shortage of reflectors | पुण्यासह राज्यातील परिवहन संवर्गगातील वाहनाचे थांबले पासिंग; 'रिफ्लेक्टर'चा मोठा तुटवडा निर्माण

पुण्यासह राज्यातील परिवहन संवर्गगातील वाहनाचे थांबले पासिंग; 'रिफ्लेक्टर'चा मोठा तुटवडा निर्माण

Next

पुणे : परिवहन संवर्गगातील प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या पाठीमागे रिफ्लेक्टर, रिफ्लेक्टिव टेप , रियर मार्किंग टेप, बसवणे बंधनकारक आहे.मात्र ते बसविले नसल्याने पुण्यासह राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील वाहनाचे पासिंग रोखण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालक चिंताक्रांत बनले आहेत. 

राज्यात रिफ्लेक्टरचा पुरवठा करणाऱ्या तीन पैकी एका कंपनीने प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याला उत्पादनास मनाई करण्यात आली आहे.तर उर्वरित दोन कंपन्यांनी रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला असल्याचे बोलले जात आहे.शिवाय रिफ्लेक्टरच्या किंमतीत ही मोठी वाढ करण्यात झाली आहे. लॉकडाऊननंतर आयुष्य कसेबसे सुरू होत असताना आता पुन्हा अशा बाबींचा फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी वाहनचालक करीत आहे.
.......
गेल्या तीन दिवसांपासून राज्यात रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याचे भाव वाढविण्यात आहे. रिफ्लेक्टर नाही म्हणून पुण्यासह राज्यात प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचे पासिंग झालेले नाही. परिवहन आयुक्तांनी याची तात्काळ दखल घ्यावी.
बापू भावे, खजिनदार, पुणे शहर रिक्षा फेडरेशन, पुणे. 
 ....
रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातना आळा बसावा म्हणून वाहनाच्या पाठीमागे रिफ्लेक्टर बसविणे अनिवार्य केले. मात्र याचा तुटवडा निर्माण झाला आहे का याची माहिती नाही.तुटवडा दूर करण्यासाठी जर अन्य काही कंपन्यांनी परवानगी मागितली तर त्यांना देखील परवानगी देऊ.  
डॉ अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई.

Web Title: Stopped passing of transport vehicles in the state including Pune; Large shortage of reflectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.