शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जोराचा पाऊस म्हणून कडेला थांबले; अचानक वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:46 IST

जोरदार पाऊस सुरु झाल्याने पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिकचा कागद घेऊन रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते

केडगाव: दौंड तालुक्यातील बोरीपार्धी (ता दौंड) येथील संजय जगन्नाथ जगताप (वय ५५) यांच्यावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे. जगताप यांच्या गट नंबर १६८/२ या क्षेत्रात शेत काम चालू होते. त्यांच्या शेतामध्ये फ्लॉवर पीक होते. या पिकाची तोडणी शेतीमध्ये चालू होती. मजुरांचे व कुटुंबातील सदस्यांचे शेतामध्ये काम सुरू होते. सायंकाळी पाचच्या सुमारास जगताप हे आपल्या मुलांना मोटरसायकल वरून शेतातील काम आटपुन सोडायला गेले होते. 

रस्त्यात थोडे पावसामुळे बाजूला थांबले होते. अंगावर पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिकचा कागद घेऊन उभे राहिले होते. इतक्यात विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. अचानक त्यांच्यावर वीज कोसळली असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. वीज कोसळल्यानंतर मगर मळा येथील डांबरी रस्त्यावर सुमारे १ ते दीड फुटाचा खड्डा पडला आहे. जगताप यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी भाऊ भाऊजी आई वडील असा परिवार आहे. परिसरातील शेतकरी या घटनेने भयभीत झालेले आहेत. याच परिसरातील दोन ऊसतोड कामगारांच्या वस्तीत असलेल्या नारळाच्या झाडावर देखील कालच दिनांक १२ रोजी वीज कोसळली होती. विजेमुळे नारळाच्या झाडाने व या कामगारांच्या झोपडीने पेट घेतला. त्यामध्ये कामगारांचे दोन चिमुकले भाजले. सुदैवाने दोन्हीही चिमुकले बचावले आहेत. त्यांच्यावर केडगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सदर घटनास्थळी भेट दिली. जोराचा वारा असल्यानंतर सुरक्षित आडोशाला उभे राहावे. तसेच परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीDeathमृत्यूthunderstormवादळweatherहवामान अंदाज