शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या फेसबुक पेजवर घाण कमेंट करणे बंद करावे", रुपाली पाटील यांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 15:52 IST

राष्ट्रवादीच्या धडाडीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे समाज माध्यमांवर नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत

पुणे : राष्ट्रवादीच्या धडाडीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे समाज माध्यमांवर नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. सोशल मीडियावरून त्या सातत्याने राजकीय घडामोडी संदर्भात पोस्ट करत असतात. राज्य सरकारच्या निर्णयावर टीकाटिपण्णी, विकास कामांबाबत भेटी, महिला अत्याचाराबाबत लढा देणे, अशा पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवरून केल्या जातात. पाटील यांच्या एखादया पोस्टवर अक्षरशः कमेंटचा पाऊसच पडतो. याबाबतच पाटील यांनी समाज माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या नागरिकांना एक विनंती केली आहे. माझ्या हक्काच्या पेजवर घाण कमेंट करणे बंद करावे असे त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. 

पाटील म्हणाल्या,  सोशल मीडियावर माझे स्वतःचे मालकी हक्काचे पेज आहे. समाजातील चुकीच्या घटना, केलेले चांगले काम या साठी मी सोशल मीडियाचा वापर करते. माझ्या पेजवर अनेक वडीलधारी मंडळी बंधू, भगिनी, मैत्रिणी , मित्र चांगल्या घरातील लोक माझ्या पेजवर आहेत. आमचा मोठा परिवार आहे. पेजवर ,अकाउंटवर जाणून बुजून अंध भक्त ,घाण कमेंट करणारे लोकांनी माझ्या पेजवर येऊ नये. 

''पेज माझ्या मालकी हक्काचे आहे.त्यामुळे जे घाण कमेंट, बदनामीकारक बोलतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतेच. परंतु चांगल्या कामाचा वेळ वाया जातो त्यामुळे माझ्या पेज वर कृपया घाण कमेंट, प्रोफाइल बंद बोलणाऱ्या लोकांनी येऊ नये अशी विनंती रुपाली पाटील यांनी केली आहे.''  

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारण