लोणावळा रेल्वेस्थानकावर लोकल गाड्या थांबवा, व्यापारी संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 10:06 IST2023-10-23T10:05:11+5:302023-10-23T10:06:06+5:30

सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांना नियमित थांबा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे...

Stop local trains at Lonavala railway station, trade association demands | लोणावळा रेल्वेस्थानकावर लोकल गाड्या थांबवा, व्यापारी संघटनेची मागणी

लोणावळा रेल्वेस्थानकावर लोकल गाड्या थांबवा, व्यापारी संघटनेची मागणी

लोणावळा (पुणे) :लोणावळा रेल्वेस्थानकावर सध्या थांबत असलेल्या लोकल रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्मवर खूप मागे थांबत असल्याने प्रवासी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

याकरिता लोणावळा-पुणे लोकल रेल्वेगाड्या स्थानकावर पूर्वी थांबत असलेल्या ठिकाणी थांबवा, अशी मागणी लोणावळा व्यापारी संघटनेच्या वतीने लोणावळा रेल्वे स्टेशन मास्तर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांना नियमित थांबा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोणावळा व्यापारी संघटना अध्यक्ष दिलीप गुप्ता, ललित सिसोदिया, जयेश संचेती, मांगीलाल जैन, ललित ओसवाल, केविल पत्रवाला व नितीन श्रीश्रीमाळ यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

Web Title: Stop local trains at Lonavala railway station, trade association demands