शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सातारा गॅझेट अहवालाबाबत पावले उचलण्यास सुरुवात; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:17 IST

सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसात सादर करावा अशा सूचना उपसमितीच्या अध्यक्षांना दिलेल्या आहेत

पुणे : मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल देण्याच्या सूचना आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना केल्या होत्या. त्यानुसार समितीचे सदस्य आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी याबाबतच्या कार्यवाहीची माहिती घेतली. मात्र, अहवालाबाबत ठोस माहिती देण्यास नकार दिला.

मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांकडून सातारा गॅझेटची सातत्याने मागणी करण्यात येत होती. मात्र, जरांगे यांच्या उपोषणानंतर झालेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने केवळ हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय़ घेतला होता. तर सातारा गॅझेटबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र, या मागणीबाबत दबाव वाढत गेल्यानंतर सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती समितीचे सदस्य सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली काही दिवसांपूर्वी साता-यात दिली होती. त्यानंतर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर भोसले यांनी शुक्रवारी याबाबतच्या कार्यवाहीची माहिती पुलकुंडवार यांच्याकडून घेतली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील उपस्थित होते. याबाबत भोसले म्हणाले, उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातारा गॅझेटबद्दल विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत. या सूचना बद्दल चर्चा केली. पुढे काही जास्त चर्चा झाली नाही. सातारा गॅझेटबद्दल अधिकृत बैठक नव्हती. उप समितीची बैठक घेण्याचे अधिकार हेच अध्यक्षांना आहेत. सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसात सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. यावर पुणे विभाग स्तरावर काय झाले याबाबत चर्चा केली. 

दरम्यान सातारा गॅझेटचा अभ्यास करून कुणबी व मराठे हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारला दिलेल्या मुदतीत याचा अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी लागणार आहे. तसेच तसेच मोडी लिपी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे. या  गॅझेटमध्ये मराठ्यांची तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक स्थिती विशद करण्यात आली आहे. त्या सर्व जुन्या नोंदीचा अभ्यास करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे. त्यामध्ये मराठा व कुणबी सिद्ध करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला इतिहास तज्ज्ञांचीही आता मदत घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेMaratha Reservationमराठा आरक्षणSatara areaसातारा परिसरOBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार