इंदापूरमध्ये सुरु होणार राज्यातील प्रगत मत्स्य महाविद्यालय, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 23:56 IST2025-10-28T23:54:31+5:302025-10-28T23:56:29+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत इंदापूर तालुक्यात नवीन मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंदापूरमध्ये सुरु होणार राज्यातील प्रगत मत्स्य महाविद्यालय, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
राज्यातील मत्स्य व्यवसायाची प्रगती व शाश्वत जलउत्पादन व्यवस्थापनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत इंदापूर तालुक्यात नवीन मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महाविद्यालयाठी आवश्यक असणारी जमीन, बांधकामाचा आराखडा व निधी नियोजनाबाबतचा प्राथमिक अहवाल वित्तमंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. शासनस्तरावरुन निधी मंजुरीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, असे ही भरणे यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेचे खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, सौर विभागाचे प्रधान सचिव विजय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन.मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, हे या बैठकीस उपस्थित होते.
पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे व्ही.सी.द्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
भरणे म्हणाले की,इंदापूर तालुक्यात स्थापन होणारे मत्स्य महाविद्यालय हे तंत्रज्ञानावर आधारित मत्स्य शिक्षण देणारे, संशोधन केंद्र असणारे राज्यातील पहिले महाविद्यालय असणार आहे.आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, जलसंसाधन व्यवस्थापन, मत्स्यजन्य उत्पादने प्रक्रिया, निर्यात गुणवत्ता प्रशिक्षण व जलचर जैवविविधता संवर्धन या विषयांवर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तेथे राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.