शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

राज्य महिला आयोगाकडून ‘ कारभारणी प्रशिक्षण अभियान’.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:23 PM

३० जिल्ह्यातील (प्रति जिल्हा ३० प्रतिनिधी) किमान  ९०० महिला सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य या गाव कारभारणींना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  

ठळक मुद्देराज्यातील ९०० महिला सरपंच, उपसरपंच व महिला लोकप्रतिनिधींची कार्यशाळा ग्रामपंचायत बॉस समजून घेणे, पंचायतीमधील सर्वोत्तम कार्यक्रमांची मांडणी करणे आदी माहिती देण्यात येणार

पुणे - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पुढाकाराने व रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट, नवी मुंबई या संस्थेच्या सहकार्याने राज्यातील पंचायतीमध्ये निवडून आलेल्या ३० जिल्ह्यातील ९०० महिला सरपंच, उपसरपंच व  ग्राम पंचायत महिला लोकप्रतिनिधीसाठी जिल्हास्तरावर एक दिवसीय ‘कारभारणी प्रशिक्षण अभियान’ राबविण्यात येत आहे.  पंचायत स्तरावरील महिला लोकप्रतिनिधींची गरज लक्षात घेऊन ग्रामीण स्तरावरील महिला लोकप्रतिनिधींना राज्य महिला आयोगाच्या कार्याची ओळख करून देणे, महिलांसाठी असलेल्या कायद्यांची आणि सरकारी आदेशाबद्दलची माहिती देणे. ग्रामपंचायत अर्थसंकल्प, शासन आदेश, ग्रामपंचायत योजना, पंचायत यंत्रणा, नव कल्पना आणि पंचायती राजमधील प्रयोग समजून घेणे या उद्देशाने  कारभारणी प्रशिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. तसेच या प्रशिक्षणातून  ग्रामपंचायत बॉस (बजेट, आॅर्डर, स्कीम्स आणि सर्व्हिसेस) समजून घेणे, पंचायतीमधील सर्वोत्तम कार्यक्रमांची मांडणी करणे आदी माहिती देण्यात येणार आहे. दि २६ जून २०१८ रोजी नाशिक जिल्ह्यात झालेल्या कार्यशाळेपासून अभियानास होणार असून, दि २० आॅगस्ट २०१८  रोजी सांगली, पालघर, अकोला, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये होणा-या कार्यशाळेने या अभियानाची सांगता होणार आहे. ३० जिल्ह्यातील (प्रति जिल्हा ३० प्रतिनिधी)  किमान  ९०० महिला सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य या गाव कारभारणींना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.     रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट, नवी मुंबई ही संस्था गेली १८ वर्षे महिला राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थातील महिला लोकप्रतिनिधींच्या शिक्षण व प्रशिक्षणाचे काम करते.-------------------------------------------------------------------------------------------------- ’घटना दुरुस्तीच्या माध्यमातून महिलांना आरक्षण मिळाल्याने मोठ्या प्रमाणात महिला लोकप्रतिनिधी गावाच्या कारभारणी झाल्या आहेत मात्र त्यांना सखोल प्रशिक्षण देणे गरजेचे असून, त्यादृष्टीने आयोगाने ‘कारभारणी प्रशिक्षण अभियान’ हाती घेतले असून यातून महिला लोकप्रतिनिधींना आयोग सक्षम करणार आहे- विजया रहाटकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाgram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकारMLAआमदार