'जीएसटी’ कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत; ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

By नम्रता फडणीस | Published: March 7, 2024 03:07 PM2024-03-07T15:07:00+5:302024-03-07T15:08:04+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून महिलेला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले

State tax woman officer in GSToffice arrested Caught red-handed while accepting a bribe of 3 thousand | 'जीएसटी’ कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत; ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

'जीएसटी’ कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत; ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे: वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालती रमेश कठाळे (वय ४३) असे गुन्हा दाखल केलेल्या राज्यकर अधिका-याचे नाव आहे.  याबाबत एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात
आल्यानंतर बुधवारी सायंकाळी वस्तू आणि सेवा कर कार्यालयात सापळा लावून कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने पत्नीच्या नावाने जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. अर्ज राज्यकर अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होता. त्यानंतर कठाळे यांनी तक्रारदार व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला जीएसटी कार्यालयात बोलावून घेतले. जीएसटी क्रमांक देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून कठाळे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

Web Title: State tax woman officer in GSToffice arrested Caught red-handed while accepting a bribe of 3 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.