शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

Chandrakant Patil: ‘महाआघाडी’ सरकार फक्त वसुली करण्यात दंग; कोर्टात जिंकलेली एक तरी केस दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 11:19 IST

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ग्रामपंचायत सरपंच, परमबीरसिंग अशा सर्वच विषयात महाआघाडी सरकार कोर्टात हरले

पुणे : ‘इतर मागासवर्गीयांच्या (OBC) राजकीय आरक्षणासंदर्भात केवळ अध्यादेश काढून भागणार नाही याची जाणीव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Mahavikas Aghadi) महाआघाडी सरकारला वारंवार करून देत होते. गेल्या दोन वर्षांत महाआघाडी सरकारने कोर्टात जिंकली अशी एक तरी केस दाखवावी. मराठा आरक्षण (Maratha Reservation), ओबीसी आरक्षण (OBC Reservation), ग्रामपंचायत सरपंच, परमबीरसिंग अशा सर्वच विषयात महाआघाडी सरकार कोर्टात हरले. कोण सल्लागार यांना डबऱ्यात घालते? पण खड्ड्यांत जाऊन यांना काहीच फरक पडत नाही. कारण त्यांना फक्त वसुली करायची आहे. सामान्य मराठे, सामान्य ओबीसींचे नुकसान होत आहे,’ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.

ओबीसी राजकीय आरक्षणाचा महाविकास आघाडी सरकारने काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. ६) फेटाळला. यामुळे मंगळवारी (दि. ७) अर्ज भरण्याची अंतिम मुदत असलेल्या १०६ नगरपरिषदा, त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका यांच्याबाबतीत काय होणार हा संभ्रम राज्य निवडणूक आयोगाने तातडीने दूर करावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, ‘ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी अध्यादेश काढून लॉलीपाॅप देण्याचा प्रयत्न केला. ओबीसींची फसवणूक राज्य सरकारने केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खूप मोठे संकट निर्माण झाले आहे. आता नगरपरिषदा, महापालिकांच्या नियोजित निवडणुका कोणत्या पद्धतीने होणार? रद्द होणार की जिल्हा परिषदेच्या झाल्या तशा ओबीसी आरक्षणाशिवायच होणार हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे.’ इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी जातनिहाय माहिती घ्यावी लागेल. २०११ मध्ये केंद्राने केलेेले सर्वेक्षण किंवा २०२१ ला जनगणना झाली नाही याचा याच्याशी संबंध येत नाही. इंपिरिकल डेटा गोळा करण्याचे काम मागासवर्गीय आयोगाचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आयोग नावालाच

''इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग नेमला. मात्र, काम सुरू करण्यासाठी आवश्यक संसाधने मिळत नसल्याचे या आयोगाने सातत्याने सांगितले. काही सदस्यांनी तर याला कंटाळून राजीनामा दिला. आयोगाचे काम इंचभरही पुढे गेले नाही. स्थापना केवळ नावापुरतीच केली, निधी दिलाच नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.''

हा सरकारचा डाव

''ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातल्या निवडणुका होऊ देणार नाही. हा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीस हजार सदस्य आहेत. यात २७ टक्के ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व न देता त्यांना पाच वर्षे सत्तेपासून दूर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. आता २०११ च्या सर्वेक्षणाचा डेटा केंद्रातून मिळत नसल्याचे छगन भुजबळ सांगतील. परंतु, त्या सर्वेक्षणाचा आणि इंपिरिकल डेटाचा काही संबंध नाही. हे दोन वेगळे विषय आहेत, असे पाटील म्हणाले.''

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण