Gopichand Padalkar: हे पांढऱ्या पायाचं सरकार; यांच्यामुळेच कोरोना, वादळ, अतिवृष्टी आली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 05:28 PM2021-11-01T17:28:12+5:302021-11-01T17:28:28+5:30

फुटात बारा इंचाचा घोळ असणारे आताचे महाराष्ट्राचे सरकार आहे

the state government caused corona, storms, heavy rains said gopichand padalkar | Gopichand Padalkar: हे पांढऱ्या पायाचं सरकार; यांच्यामुळेच कोरोना, वादळ, अतिवृष्टी आली

Gopichand Padalkar: हे पांढऱ्या पायाचं सरकार; यांच्यामुळेच कोरोना, वादळ, अतिवृष्टी आली

googlenewsNext

पुणे : महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi) विकासकामे तसेच आर्यन खान (Aryan khan) प्रकरणावरून भाजप नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे. हे सरकार राज्यातील संकटे सूर करण्यास असफल ठरत असल्याचा आरोपही विरोधी पक्षांकडून होत आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सुद्धा पुण्यात एका कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे पांढऱ्या पायाचं सरकार आहे. यांच्यामुळेच कोरोना, अतिवृष्टी, वादळ आले असल्याची टीका पडळकर यांनी केली आहे. 

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कूल आदी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले, ''फुटात बारा इंचाचा घोळ असणारे आताचे महाराष्ट्राचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक प्रवक्ता उठतो आणि गांजावाल्याची बाजू मांडतो. हे असलं सरकार म्हणजे पांढऱ्या पायाचे सरकार असून यांच्यामुळे कोरोना आला, दोन वेळा वादळ आलं, दोन वेळा अतिवृष्टी आली असे म्हणत पडळकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.'' 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी बोलताना पडळकर म्हणाले, सरकार मधील काही लोक सहकारी साखर कारखाने आजारी पाडून खरेदी करत आहेत. पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्न पवारांना सोडवता आला नाही. तर राज्याचे प्रश्न काय सोडवणार अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.''

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, अनैसर्गिक सरकार असून तीन पक्षाचे सरकार कायमस्वरूपी राहणार नाही. तसेच पुढील काळात दौंड आणि इंदापूरच्या पाणी प्रश्नासाठी कायम आग्रही राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: the state government caused corona, storms, heavy rains said gopichand padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.