शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 4:33 PM

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील पीएमआरडीएचा दुसरा मेट्रो प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. 

ठळक मुद्देपीएमआरडीएकडून मेट्रोसाठी ६ हजार ४०० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादरपुणे महानगरपालिकेच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांस झाली सुरूवात

पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील पीएमआरडीएचा दुसरा मेट्रो प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर पीएमआरडीए मार्फत अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली, या वृत्तास पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांनी दुजोरा दिला आहे. पीएमआयडीएच्या मेट्रो प्रकल्पास केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २० टक्के निधी मिळणार असून उर्वरित ६० टक्के निधी खासगी उद्योजकांच्या सहभागातून उभा केला जाणार आहे. पीएमआरडीएकडून मेट्रोसाठी ६ हजार ४०० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. पुणे महानगरपालिकेच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांस सुरूवात झाली आहे.मात्र, पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्प राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत होता.परंतु, त्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पीपीपी तत्त्वारील मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे लवकरच शहरात दोन मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू झालेली दिसतील, असे मेट्रो प्रकलपाशी निगडीत अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीMetroमेट्रोPuneपुणे