शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

राज्य बँकेत परदेशी चलनाचे व्यवहार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 8:10 PM

प्रतिवर्षी तब्बल १ हजार कोटी रुपयांचे परदेशी चलनाचे व्यवहार राज्य बँक सांभाळत होती. मात्र, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेने परकीय चलनाचे व्यवहार अतिशय कडक केले.

ठळक मुद्देसाखर कारखान्यांना होणार फायदा : वर्ल्ड ट्रेडवरील हल्ल्यानंतर व्यवहार झाले होते बंद नुकतेच अमेरिकेतील हबीब अमेरिकन बँक, न्यूयॉर्कने राज्य बँकेचे नॉस्ट्रो खाते सुरुकेंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी प्रतिगोणी ५५ रुपयांचे अनुदान जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला पुन्हा परदेशी चलनाचे विनिमय करण्यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) परवानगी दिली आहे. अशी परवानगी मिळालेली राज्य सहकारी बँक देशातील एकमेव सहकारी बँक ठरली आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर तडकाफडकी विदेशी विनिमयाची परवानगी रद्द करण्यात आली होती. नव्याने मिळालेल्या या परवान्यामुळे साखर कारखान्यासह राज्यातील विविध आस्थापनांना फायदा होणार आहे. राज्य सहकारी बँकेला आरबीआयने १९८८ साली विदेश विनिमयाचा परवाना दिला होता. या व्यवहारासाठी आवश्यक ‘नॉस्ट्रो’ खाते राज्य बँकेने बँक आॅफ इंडियामध्ये उघडले होते. त्या माध्यमातून विदेशी चलनाचे व्यवहार करण्यात येत होते. राज्य बँकेने कर्ज पुरवठा केलेल्या सूतगिरण्या तसेच साखर कारखान्यांच्या आयात निर्यातीसाठी त्याचा चांगला फायदा होत होता. राज्यातील जिल्हा आणि नागरी बँकांकडे अशा प्रकारचा परवाना नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडील खातेदारांचे व्यवहार देखील राज्य बँकेमार्फत करण्यात येत होते. या व्यवहारातील कमिशन दोन्ही बँका निम्मे वाटून घेत. अमेरिकन डॉलर, ब्रिटीश पौंड, युरो आणि जापनीज येन चलनाचे व्यवहार या माध्यमातून केले जातात. जगभरातील व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये होत असल्याने, अर्थातच डॉलर मधील व्यवहारांचे प्रमाण जास्त होते. त्या वेळी प्रतिवर्षी तब्बल १ हजार कोटी रुपयांचे परदेशी चलनाचे व्यवहार राज्य बँक सांभाळत होती. मात्र, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेने परकीय चलनाचे व्यवहार अतिशय कडक केले. दहशतवाद्यांना बाहेरुन पतपुरवठा होऊ नये यासाठी अमेरिकेने ‘पॅट्रीअ‍ॅक्ट’ लागू केला. त्यामुळे राज्य बँकेतील विदेशी चलनाचे व्यवहार बंद झाले होते. विदेशी चलनाचे व्यवहार पुन्हा सुरु करावेत यासाठी राज्य बँकेकडून प्रयत्न सुरु होते. नुकतेच अमेरिकेतील हबीब अमेरिकन बँक, न्यूयॉर्कने राज्य बँकेचे नॉस्ट्रो खाते सुरु केले आहे. त्यामुळे राज्य बँक आयात निर्यात व्यवहार सुरु करु शकणार असल्याची माहिती राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. ----------------

राज्यातून विदेशात साखर निर्यात होते. नुकतीच केंद्र सरकारने निर्यातीसाठी प्रतिगोणी ५५ रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य बँकेतील सुविधेचा साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, राज्य सहकारी बँक प्रशासकीय मंडळ .......................

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेbankबँकAmericaअमेरिका