शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सुषमा स्वराज यांच्या नावाने पुरस्कार सुरु करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 7:46 PM

स्वराज यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक मानवी चेहरा दिला...

ठळक मुद्देमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वराज यांना श्रध्दांजली

पुणे : माजी परराष्ट्र मंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे प्रतिक होत्या. त्यांनी आपल्या कणखर नेतृत्वाच्या जोरावर देश-विदेशात आपला दबदबा निर्माण केला. देशातील सर्व प्रामुख्याने राजकारणातील महिलांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला. अशा या नेत्याच्या नावाने पुणे महापालिकेत महिला सक्ष्मीकरणाची योजना व पुरस्कार सुरु करण्याची मागणी करत सदस्यांनी सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली वाहिली.    स्वराज यांच्या बद्दल बोलताना सदस्यांनी सांगितले की, स्वराज यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक मानवी चेहरा दिला. राजकारणातील स्त्रीयासाठी आदर्श नेत्या होत्या. त्याच्या प्रत्येक कृतीमधून खानदानी पण पदोपदी दिसून येत होता. अत्यंत दिलखुलास व्यक्तीमत्व होते. परराष्ट्र मंत्री असताना विविध देशांमध्ये अडकलेल्या अनेक सर्वसामान्य व्यक्तींना त्यांनी मदत केली. यामुळेच संकटमोचक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. तसेच सोशलमिडियाचा देखील त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी उपयोग केला. आपल्या कणखर नेतृत्वाच्या जोरावर वेगळाच दरारा निर्माण केला होता. यामुळेच स्वराज यांच्या नावाने महापालिकेमध्ये महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र योजना सुरु करावी. तसेच विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणा-या महिलांना स्वराज यांच्या नावाने पुरस्कार सुरु करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. यामध्ये गोपाळ चिंतल, ज्योत्स्ना एकबोटे, माधुरी सहस्त्रबुध्दे,  नंदा लोणकर, पृथ्वीराज सुतार, अविनाश बागवे, वसंत मोरे, दिलीप बराटे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह महापौर मुक्ता टिळक यांनी श्रध्दांजली वाहिली.-----------------------सांगली- कोल्हापूरातील पूरग्रस्तांना भरघोस मदत करासांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना देखील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेता श्रध्दांजली वाहन्यात आली. यावेळी महापालिकेच्या सर्व सदस्यांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ही मदत कमी असून, महापालिकेने पूरग्रस्तासाठी भरघोस मदत करावी, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेSushma Swarajसुषमा स्वराजPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका