शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

६५व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या सुरेल स्वरयज्ञास १३ डिसेंबरपासून पुण्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:49 PM

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची अनुभूती देणाऱ्या ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या सुरेल स्वरयज्ञास उद्यापासून (बुधवार, दि. १३ नोव्हेंबर) प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देमहोत्सवामध्ये तब्बल २८ कलाकार सादर करतील आपला कलाविष्कार दुपारी ३ वाजता मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनाने महोत्सवाला होणार सुरुवात

पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची अनुभूती देणाऱ्या ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या सुरेल स्वरयज्ञास उद्यापासून (बुधवार, दि. १३ नोव्हेंबर) प्रारंभ होत आहे. बुजूर्ग दिग्गजांबरोबरच उदयोन्मुख कलाकारांचा आविष्कार असलेल्या या महोत्सवात रविवापर्यंत (१७ डिसेंबर) पाच दिवसांचा स्वरयज्ञ कानसेन रसिकांना अनुभवावयास मिळणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर आयोजित या महोत्सवाचे यंदा ६५ वे वर्ष आहे. यंदाच्या 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'मध्ये तब्बल २८ कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. भारतीय संस्कृतीमध्ये शुभकार्याचा प्रारंभ मंगल वाद्याच्या वादनाने करण्याची प्रथा आहे. त्यानुसार दुपारी ३ वाजता मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मूळचे दिल्लीचे आणि सध्या इंग्लंड येथे वास्तव्यास असलेले आणि काही काळ भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे मार्गदर्शन लाभलेले डॉ. विजय राजपूत यांचे गायन होईल. त्यानंतर कोलकाताचे देबाशिष भट्टाचार्य यांचे चतुरंगी (स्लाईड गिटार) वादन होईल. भट्टाचार्य हे अजय चक्रवर्ती आणि पं. ब्रिजभूषण काब्रा यांचे शिष्य आहेत. त्यानंतर बनारस घराण्याचे पं. राजन-साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे. पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. महोत्सवाच्यानिमित्ताने रसिकांची संगीतविषयक जाण वाढविण्याच्या उद्देशातून ‘अंतरंग’ आणि ‘षड्ज’ हे उपक्रम आयोजित केले जातात. कलाकाराशी संवाद असे स्वरूप असलेल्या ‘अंतरंग’मधून त्या कलाकाराची जडणघडण आणि त्याचे सांगीतिक विचार रसिकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारी (दि. १३) ‘षड्ज’ अंतर्गत भास्कर राव दिग्दर्शित ‘म्युझिक आॅफ इंडिया’ (इंस्ट्रुमेंटल) हा लघुपट दाखविण्यात येईल. त्यानंतर प्रमोद पाटी यांनी दिग्दर्शित केलेला ‘रवी शंकर’ हा माहितीपट रसिकांना पाहता येईल. यानंतर एस. बी. नायमपल्ली यांनी दिग्दर्शित केलेला पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्यावरील लघुपट दाखविण्यात येणार आहे. ख्यातनाम कलाकारांबरोबर संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ मध्ये यावर्षी प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. गायन क्षेत्रातील त्यांचा प्रवास ऐकण्याची संधी यावेळी रसिकांना मिळणार आहे. श्रीनिवास जोशी हे यावेळी त्यांच्याशी संवाद साधतील. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत.

बुधवारी महोत्सवात (दुपारी ३ वाजता) - 

मधुकर धुमाळ (सनई)डॉ. विजय राजपूत (गायन)देबाशिष भट्टाचार्य (चतुरंगी वादन)पं. राजन आणि साजन मिश्रा (गायन)पं. हरिप्रसाद चौरसिया (बासरी) 

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीत