शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro: भुयारी मेट्रोच्या फलाटावर उभे राहून न्याहाळता येणार मोकळे आकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:32 IST

सिव्हिल कोर्ट भुयारी स्थानकात अभियांत्रिकी आविष्कार

राजू इनामदार

पुणे : जमिनीखाली २८ ते ३० मीटर खोलीवर ५ किलोमीटर अंतराची दोन सलग भुयारे खोदून काढणाऱ्या महामेट्रोने आता त्यांच्या सिव्हिल कोर्ट भुयारी स्थानकात आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार केला आहे. या स्थानकाच्या जमिनीपासून ९० फूट खाली असणाऱ्या मेट्रोच्या फलाटावर उभे राहून प्रवाशांना वरचे मोकळे आकाश न्याहाळता येणार आहे.

मेट्रोचे सिव्हिल कोर्ट स्थानक हे इंटर चेंज स्थानक आहे. तिथे भुयारी मेट्रो व रस्त्यावरून जाणारी मेट्रो यांचे एकत्रीकरण होणार आहे. या स्थानकात एकत्र होणाऱ्या या मेट्रो तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा वेगवेगळ्या होणार आहेत. याच स्थानकात महामेट्रोने हा नभांगण पाहता येणारा प्रकार भुयारी स्थानकाच्या फलाटावर केला आहे.

अशी केली रचना

- जमिनीखाली साधारण ९० फूट अंतरावर हे स्थानक आहे. त्याच्या १४० मीटर अंतराच्या फलाटाचा साधारण ४० ते ५० मीटरचा भाग हा खालून वरपर्यंत एखाद्या डक्टसारखा मोकळा असणार आहे.- तिथून थेट फलाटावर सूर्यप्रकाश तसेच चंद्रप्रकाश पडेल अशी ही रचना आहे. वरील बाजूस काचेचा भला मोठा गोल असणार आहे. मात्र, तिथून खाली थेट फलाटापर्यंत मधे काहीच बांधकाम वगैरे नसेल. एकदम मोकळी जागाच असेल. त्यामुळे खाली फलाटावर थांबलेल्या प्रवाशाने वर पाहिले की त्याला थेट आकाशच दिसणार आहे.- मोकळे असणारे हे अंतर वगळता फलाटाची अन्य जागा बंदिस्त असेल. प्रवाशांसाठी असलेली साधे जिने, सरकते जिने व लिफ्ट ही व्यवस्था या बंदिस्त जागेत असेल.- शिवाजीनगर ते स्वारगेट हे मेट्रोचे ५ किलोमीटर अंतर पूर्ण भुयारी आहे. त्यात शिवाजीनगर, कसबा पेठ, सिव्हिल कोर्ट, मंडई व स्वारगेट ही स्थानके आहेत. त्यातील फक्त सिव्हिल कोर्ट भुयारी स्थानकातच अशी डक्टची व्यवस्था केली आहे.- बाकी स्थानके बंदिस्त आहेत. त्यामध्ये वर जा-ये करण्याच्या जागेतून जे काही दिसेल तेवढेच. सिव्हिल कोर्ट स्थानकावर त्यासाठी खास वेगळे बांधकाम करण्यात आले आहे.

पुणे शहरासाठी एक वेगळा व आकर्षक प्रकार 

''भुयारी स्थानके हाच पुणे शहरासाठी एक वेगळा व आकर्षक प्रकार आहे. जमिनीच्या खालून प्रथमच पुणे शहरात असा प्रवास होणार आहे. त्यातही वेगळेपण आणण्यासाठी म्हणून सिव्हिल कोर्ट स्थानकात ही खास रचना करण्यात आली आहे. - डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.'' 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोSocialसामाजिकpassengerप्रवासी