शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले चौपदरीकरण होणार सुरू

By admin | Updated: June 11, 2015 06:05 IST

बारामती-फलटण-लोणंद-शिरवळमार्गे बंगरुळू महामार्गाला जोडणाऱ्या राज्य मार्गाचे चौपदरीकरण मागील ५ वर्षांपासून रखडले आहे.

महेंद्र कांबळे, बारामतीबारामती-फलटण-लोणंद-शिरवळमार्गे बंगरुळू महामार्गाला जोडणाऱ्या राज्य मार्गाचे चौपदरीकरण मागील ५ वर्षांपासून रखडले आहे. रीतसर भूसंपादन प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली. ठेकेदाराने दिरंगाई झाल्यामुळे राज्य शासनाकडेच नुकसान भरपाई मागितली. आता नुकसान भरपाई देऊन वाढीव खर्चासह या मार्गाचे काम येत्या महिनाभरात सुरू होईल, असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागाच्या देखरेखीत आयव्हीआरसीएफ या कंपनीला बीओटी तत्त्वावर २०१० साली हे काम देण्यात आले. त्यामुळे बारामती थेट या रस्त्याच्या माध्यमातून दक्षिण भारताला जोडली जाणार आहे. ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी एकत्रित प्रकल्प खर्च ३८२ कोटी रुपये अपेक्षित होता. परंतु, भूसंपादन करण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवातीला तडजोडीने जागा संपादित केल्या. मात्र, फलटण, लोणंद, बारामती परिसरातील शेतकऱ्यांनी त्यासाठी देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम कमी आहे. त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी केली. त्याची पूर्तता झाली नाही. भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांचा विरोध वाढला. काम थांबले. या स्थितीत ५ वर्षांपासून रस्त्याचे काम ५० टक्के रखडले आहे. परंतु, हा रस्ता सद्य:स्थितीला दररोज अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. मध्यंतरी पॅचवर्कसाठी ३ कोटी रुपयांचे काम करण्यात आले. परंतु, रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हा रस्ता पूर्ण करणे गरजेचे आहे. दरम्यान, या संदर्भात विधान परिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत अधिकाऱ्यांची बैठक मागील आठवड्यात मंत्रालयात झाली. ठेकेदाराने मागितलेली भरपाईची ८९ कोटी रुपयांची रक्कम देऊन वाढीव खर्चासह काम सुरू करण्याची चर्चा झाली आहे. या संदर्भात माहिती देताना पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. टी. धोंडगे यांनी सांगितले, की प्रक्रिया पार पाडताना विलंब झाला. त्याचबरोबर काही शेतकरी सरकारच्या विरोधात न्यायालयात गेले. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला. तो वाढीव खर्च ठेकेदाराने मागितला. ७७ किलोमीटरपैकी ४८ किलोमीटरचे काम झाले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांच्या उपस्थित निर्णय झाल्याने येत्या काही दिवसांत ठेकेदाराची ८९ कोटी रुपये भरपाई देण्यात येईल. त्यानंतर जुलै महिन्यात रस्त्याचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. साधारणत: १ ते दीड वर्षात काम पूर्ण करण्यात येईल.