एसटी-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, भीमाशंकर परिसरातील अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:44 IST2024-06-11T13:44:20+5:302024-06-11T13:44:43+5:30
एसटी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ओम संदीप लोहकरे (वय १९) याचा जागीच मृत्यू झाला...

एसटी-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, भीमाशंकर परिसरातील अपघात
तळेघर (पुणे) : श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसटी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ओम संदीप लोहकरे (वय १९) याचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मंचर-भीमाशंकर रस्त्यावर राजपूर गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या भक्तनिवासासमोर मंचर आगाराची एसटी बस (एमएच ०६ एस ८३९७) ही पुण्यावरून भीमाशंकरकडे जात होती. तर म्हतारबाचीवाडी येथून ओम संदीप लोहकरे हा तरुण दुचाकी क्रमांक (एमएच १४ एफव्ही २४१५) घेऊन तळेघरच्या दिशेने निघाला होता.
भीमाशंकर भक्तनिवासासमोर एसटी बसही भरधाव वेगामध्ये असताना दुचाकी स्वरास बसच्या मागील बाजूचा कट लागला. यामध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती घोडेगाव पोलिस स्टेशनला मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसटीचा चालक नीलेश सखाराम भोर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तपास घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर करीत आहेत.